भूम : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा नवऱ्याने प्रेयसीच्या मदतीने टोकदार शस्त्राने खून करून नंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याची खळबळजनक घटना भूम तालुक्यातील ईराचीवाडी येथे घडली.
ईराचीवाडी येथील सुरज लहु तोरकड याचे लग्न पोर्णीमा (वय 18 वर्षे ) हिच्याशी नुकतेच झाले होते. लग्नानंतरही सुरज लहु तोरकड याचे भाग्यश्री भोरे हिच्याशी प्रेमसंबंध सुरु होते. सुरज आणि भाग्यश्री यांचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पोर्णीमा त्याला विरोध करीत होती. त्यामुळे प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नी पौर्णिमा हीचा नवरा सूरज याने प्रेयसी भाग्यश्रीच्या मदतीने काढला काटा काढला.
आरोपी नामे-1) सुरज लहु तोरकड, 2) सासु मनिषा लहु तोरकड, 3) सुरज लहु तोरकड ची प्रेमिका भाग्यश्री भोरे सर्व रा. ईराचीवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.02.03.2024 रोजी 21.30 ते दि. 03.03.2024 रोजी 17.00 वा. पुर्वी ईराचीवाडी ता. भुम जि. धाराशिव आरोपी सुरज याच्या राहात्या घराच्या संडास मध्ये मयत नामे- पोर्णीमा सुरज तोरकड, वय 18 वर्षे रा. ईराचीवाडी ता. भुम जि. धाराशिव यांना सुरज तोरकड व भाग्यश्री भोरे यांचे प्रेमसंबंधाचे कारणावरुन मयत पोर्णीमा ही त्यांना अडथळा होत असल्याने नमुद आरोपींनी संगणमत करुन पोर्णीमाचे पोटात टोकदार शस्त्राने वार करुन जिवे ठार मारुन तीचे अंगावर व चेहऱ्यावर ज्वलनशिल पदार्थ टाकुन तीचे ओळख न पटण्यासाठी प्रेत जाळून पुरावा नष्ट केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनोहर वसंत पासलकर, वय 52 वर्षे, रा. सर्वे नं 44 केळेवाडी पौडरोड क्रांतीवीर मित्रमंडळ चौक पुणे 38 यांनी दि.04.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 302, 201, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.