धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं बोगस नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र प्रकरण सध्या चर्चेत आहे. साहेब म्हणतात, दोन पत्रकारांनी त्यांना ब्लॅकमेल करून बेकायदेशीर कामे सांगितली. कामं केली का नाही, हे मात्र अद्याप ‘गुप्त’ आहे, जणू काही साहेबांनी “सिक्रेट मिशन” पूर्ण केलंय! पण प्रश्न असा आहे, जिल्हा दंडाधिकारी असूनही या साहेबांनी या ब्लॅकमेल पत्रकारांवर केस का नाही केली? साहेबांचे हे “क्राईम मिस्ट्री” अजून उलगडत नाही.
साहेबांचं म्हणणं आहे की हे ब्लॅकमेल प्रकरण खूप पूर्वीचं आहे, आणि दोन पत्रकारांनी त्यांना दमात घेतलं होतं. आता आमचे “धाराशिव लाइव्ह” त्यांना थेट आव्हान देत आहे की त्यांनी त्या पत्रकारांची नावे जाहीर करावीत. नाहीतर वाटतंय, ही सगळी गोष्ट “माणुसकीच्या गोष्टी”सारखी फक्त सांगायचीच आहे!
आता याचं एक नवं ट्विस्ट, भोपाळशेठच्या पेपरमधील एका पत्रकाराने साहेबांची बाईट म्हणजेच ‘कोट’ घेतली होती. पण, १५ दिवस उलटूनही त्याची धाडसी बातमी काही आली नाही! त्याऐवजी धाराशिव लाइव्हवर बातमी आली, आणि त्या पत्रकाराची सुतारकी मात्र चांगलीच पश्चाताप करतेय.
धाराशिवमध्ये सध्या साहेबांची चाटूगिरी करणारे पत्रकारांचा डाव मांडला जातोय. या चाटूगिरी करणाऱ्यांना वाटतं, साहेब त्यांचे खास आहेत. पण त्यांचा हा गोड गैरसमज त्यांना आता चांगलाच नडत आहे. साहेबांनी त्यांचं ‘खास’पण बघून गुपचूप स्मितहास्य केलंय, असं वाटतंय!
तर मंडळी, आता सगळ्या पत्रकारांनी आपल्या नोंदी करायला हरकत नाही. साहेबांच्या प्रकरणात अजून किती ट्विस्ट्स येतील, ते पाहायचं आहे.
– बोरूबहाद्दर
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे खुलासा करून स्वतः फसले !