• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

एमआरआय व सीटी स्कॅन मशीन हलविण्याचा निर्णय तत्काळ रद्द करा

 – आमदार कैलास पाटील यांची मागणी

admin by admin
February 1, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची दयनीय परिस्थिती असताना, येथील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्र लिहून त्यांनी हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारने धाराशिव जिल्हा रुग्णालयातील एमआरआय मशीन इचलकरंजी येथे आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार पाटील यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य सुविधांचा अभाव आणि शासनाचा दुर्लक्ष

जिल्ह्यातील नागरिकांना आधीच उपचारांसाठी सोलापूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून उपलब्ध असलेल्या सुविधाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “हे कुणाच्या सुपीक डोक्यातून सुचले?” असा संतप्त सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

गरीब रुग्णांचे हाल होणार

सामान्य नागरिक खाजगी रुग्णालयांमधील महागड्या सेवा परवडत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याऐवजी त्या कमी करण्याचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. आधीच धाराशिव जिल्हा कायम दुष्काळग्रस्त असल्याने शासनाकडून सापत्न वागणूक मिळते, त्यात आता आरोग्य सुविधाच काढून घेण्याचा निर्णय घेतला जात आहे.

हा प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेला असून, एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन हलविण्याचा निर्णय तत्काळ रद्द करून त्या सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.

Previous Post

खासगी केंद्रांना आर्थिक फटका बसू नये म्हणून जिल्हा रुग्णालयातील एम. आर. आय. स्कॅन मशीन कोल्हापूरला हलवले

Next Post

धाराशिव : अधिष्ठातांच्या चुकीच्या अहवालामुळे धाराशिववर अन्याय

Next Post
धाराशिव : एमआरआय स्कॅन मशीन जागेअभावी कोल्हापूर जिल्ह्यात हलवले

धाराशिव : अधिष्ठातांच्या चुकीच्या अहवालामुळे धाराशिववर अन्याय

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!