• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम: पोलीस नोटीस झुगारून रेड्यांच्या टकरींचे आयोजन; आयोजक व मालकांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
December 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : भूम तालुक्यातील आरसोली शिवारात प्रशासनाची परवानगी न घेता आणि पोलिसांची नोटीस झुगारून रेड्यांच्या टकरी (झुंजी) आयोजित केल्याप्रकरणी भूम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पैजेसाठी आणि मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या टकरींत प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी आणि लोकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी आयोजकांसह एकूण १३ जणांवर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास मौजे आरसोली (ता. भूम) येथील शेत शिवारात, खडी क्रेशर मशीनच्या बाजूला असलेल्या पटांगणात हा प्रकार घडला. आरोपी विजयसिंह थोरात यांना रेड्यांच्या टकरी न घेण्याबाबत पोलिसांनी कलम १६८ बी.एन.एस.एस. अन्वये आगाऊ नोटीस दिली होती. मात्र, त्यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आणि आपले पुतणे यशवंत थोरात यांच्या मदतीने टकरींचे आयोजन केले.

या स्पर्धेत रेड्यांना एकमेकांशी झुंजवून जखमी करण्यात आले. तसेच, झुंजीत उधळलेले रेडे तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या दिशेने पळाल्याने बघ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलीस नाईक संदेश पंडित क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल:

पोलिसांनी खालील १३ जणांवर गुन्हा क्रमांक ३८१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, २९१ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (a), (m), (n) नुसार गुन्हा दाखल केला आहे:

  • आयोजक: १) विजयसिंह थोरात, २) यशवंत धनाजी थोरात (दोघे रा. भूम).

  • रेडा मालक: ३) बालाजी लाला काळे (रा. हिवरा), ४) निलेश गुळमे (रा. भूम), ५) रावजी उर्फ पल्या काळे (रा. कल्याणनगर, भूम), ६) शंकर राजु काळे (रा. ढोकी), ७) विलास भारती, ८) विलास लोंढे, ९) ओंकार होळकर, १०) गुड्डु गाडे (सर्व रा. भूम).

  • पंच: ११) सुनिल माळी, १२) जावेद शेख, १३) स्वप्निल उर्फ पिट्या हावळे (सर्व रा. भूम).

सदर कारवाई पोलीस निरीक्षक कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करत आहेत.

Previous Post

धारूर शिवारातून सव्वा लाखाची सोलार मोटर लंपास; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Next Post

१० कोटी सोडा, १० पैशांचीही लायकी नाही; ‘ड्रग्ज’च्या दलदलीत बरबटलेल्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये!

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

१० कोटी सोडा, १० पैशांचीही लायकी नाही; ‘ड्रग्ज’च्या दलदलीत बरबटलेल्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये!

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!