• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तुळजापूर भेटीवर आमदार कैलास पाटील यांचा उपरोधिक टोला

admin by admin
March 29, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापुरात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूरच्या पवित्र नगरीत येत आहेत. यानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

आमदार कैलास पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना लिहिले आहे की,

“मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीत आपले मनःपूर्वक स्वागत!”

पुढे त्यांनी फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण घोषणा आठवण करून दिली आहे. कैलास पाटील यांनी नमूद केले की, मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. यानिमित्ताने त्यांनी फडणवीस यांना निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेली कर्जमाफीची वचनबद्धता पुन्हा एकदा स्मरण करून दिली.

आमदार कैलास पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की,
“निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तसा निर्णयही आपल्या तत्कालीन सरकारने घेतला असल्याचे शब्द तुमचेच होते. माझ्या धाराशिवसह तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या या शब्दावर विश्वास ठेवला आणि आपल्याला पदरी भरभरून यश दिले. आता त्या शब्दाला जागण्याची नैतिक जबाबदारी तुमचीच आहे.”

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करण्याची गरज असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी ठामपणे मांडले आहे. त्यांनी स्पष्ट केले की,

“आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र दरबारातून आपण संपूर्ण कर्जमाफीची घोषणा कराल आणि आपल्या शब्दाला जागाल, अशी आशा धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना लागून आहे.”

तसेच, शेतकऱ्यांविषयी आपले प्रेम आणि कर्तव्य सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तुळजापूर भेटीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात काही ठोस निर्णय जाहीर केला जातो का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Previous Post

माध्यमांमधील बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी

Next Post

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण: SIT नेमा , आरोपींना मकोका लावा…

Next Post
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण:  SIT नेमा , आरोपींना मकोका लावा…

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण: SIT नेमा , आरोपींना मकोका लावा...

ताज्या बातम्या

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाकरी फिरली!

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाकरी फिरली!

October 29, 2026
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

वडगाव सि. : जिल्हा परिषद शाळेतून दोन १५ वर्षीय शाळकरी मुलांचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून लॉज मालक व मॅनेजरची गुंडगिरी; गुलबर्गा येथील पर्यटकावर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला

October 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाघोली : बौद्धिक दिव्यांग दांपत्याला लोखंडी पट्टीने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण

October 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माडज : मोटारसायकल नेल्याच्या कारणावरून महिलांना काठी व बेल्टने बेदम मारहाण

October 26, 2026

Recent Posts

  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाकरी फिरली!
  • वडगाव सि. : जिल्हा परिषद शाळेतून दोन १५ वर्षीय शाळकरी मुलांचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून लॉज मालक व मॅनेजरची गुंडगिरी; गुलबर्गा येथील पर्यटकावर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला
  • वाघोली : बौद्धिक दिव्यांग दांपत्याला लोखंडी पट्टीने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण
  • माडज : मोटारसायकल नेल्याच्या कारणावरून महिलांना काठी व बेल्टने बेदम मारहाण
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!