• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या ऊस बिला थकवल्याप्रकरणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंविरोधात तक्रार

 शिवसेना एकनाथ शिंदे गटातील प्रवेशाला विरोध

admin by admin
June 5, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांच्या ऊस बिला थकवल्याप्रकरणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंविरोधात तक्रार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी ऊस उत्पादक शेतकरी आयुब शेख (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साखर आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची देणी दिली जात नाहीत, तोपर्यंत म्हेत्रे यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश देऊ नये, अशी मागणीही शेख यांनी केली आहे.

शेतकरी आर्थिक संकटात, आत्महत्येच्या मार्गावर

अक्कलकोट तालुक्यातील माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मालकीच्या मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अनेक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर असल्याचे गंभीर वास्तव मांडण्यात आले आहे. साखर प्रशासनानेही शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे न दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. “कारखानदार जोमात, शेतकरी कोमात” अशी सध्याची परिस्थिती असून शेतकऱ्यांना कोणताही सण उत्सव साजरा करता येत नाहीये किंवा शेतीची मशागतही करता येत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले आहे.

कारखान्याकडून धमक्या, बिलासाठी चकरा

शेतकरी वारंवार कारखान्याच्या चकरा मारून बिलाची मागणी करत आहेत. मात्र, “तुम्हाला काय करायचे आहे ते करा, आम्ही बिल देत नाही,” अशा धमक्या शेतकऱ्यांना दिल्या जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री आणि साखर आयुक्तांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली आहे. शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून ते मिळवून द्यावे आणि त्यानंतरच सिद्धाराम म्हेत्रे यांचा पक्षप्रवेश स्वीकारावा, अशी विनंती आयुब शेख यांनी केली आहे. तसेच, साखर आयुक्तांनी मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने बिल न दिल्याने सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आठ दिवसांचा अल्टिमेटम

शेतकरी पुत्र आयुब शेख यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांचे ऊस बिल न मिळाल्यास साखर आयुक्तांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा दिला आहे. या तक्रारीची उपमुख्यमंत्री आणि साखर आयुक्तांनी लवकरात लवकर नोंद घेऊन थकलेले ऊस बिल शेतकऱ्यांना मिळवून द्यावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.

 

Previous Post

धाराशिवचे ‘राज’कारणी: खुर्चीसाठी खुमासदार कुस्त्या आणि ‘ड्रग्ज’दार टोलेबाजी!

Next Post

धाराशिवच्या राजकीय आखाड्यात ड्रग्जचा धुरळा: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापले!

Next Post
धाराशिवच्या राजकीय आखाड्यात ड्रग्जचा धुरळा: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापले!

धाराशिवच्या राजकीय आखाड्यात ड्रग्जचा धुरळा: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापले!

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!