• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात महापुरुषांच्या नावाच्या पाटीवर राजकीय नेत्यांची नावे; जनहित संघटनेचा आक्षेप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

admin by admin
August 13, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापुरात महापुरुषांच्या नावाच्या पाटीवर राजकीय नेत्यांची नावे; जनहित संघटनेचा आक्षेप, गुन्हा दाखल करण्याची मागणी
0
SHARES
334
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील लाईटिंग बोर्डवर स्थानिक राजकीय नेत्यांची नावे वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपुरुषांच्या नावाचा वापर राजकीय प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचा आरोप करत, जनहित संघटना महाराष्ट्र राज्यने ही नावे तात्काळ काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संघटनेने ११ ऑगस्ट २०२५ रोजी  तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले आहे.

संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहरातील राणी लक्ष्मीबाई शॉपिंग सेंटरवर लावण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ या बोर्डवर ‘मार्गदर्शक आ. राणाजगजितसिंह पाटील’ आणि ‘सकंल्पना विशाल भैय्या रोचकरी’ अशी नावे लिहिण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बोर्डवर ‘सौजन्य विनोद (पिटु भैय्या) गंगणे तुळजापूर’ असे नाव लावण्यात आले आहे. 

जनहित संघटनेच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या नावाचा वापर वैयक्तिक आणि राजकीय प्रसिद्धीसाठी करणे हा त्यांचा अवमान आहे आणि यामुळे तमाम शिवप्रेमी आणि भीमप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. ‘सौजन्य’ किंवा ‘मार्गदर्शक’ अशा नावांच्या वापरामुळे संबंधित व्यक्तीनेच तो पुतळा किंवा स्मारक उभारल्याचा आभास निर्माण होतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या:

  • चौकांमधील बोर्डवरून ‘मार्गदर्शक’, ‘सकंल्पना’, आणि ‘सौजन्य’ ही राजकीय नेत्यांची नावे तात्काळ हटविण्यात यावीत.
  • राष्ट्रपुरुषांचा अपमान करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी बोर्ड लावणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम १५३ ए आणि ५०५ नुसार गुन्हे दाखल करावेत.

संघटनेने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने यावर कारवाई केली नाही, तर शिवप्रेमी आणि भीमप्रेमी स्वतः ही नावे काढतील. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

हे निवेदन जनहित संघटनेचे अध्यक्ष अजय (भैय्या) मालुले आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहीनिशी मुख्यधिकारी, नगर परिषद तुळजापूर यांना देण्यात आले असून, त्याची एक प्रत माहितीसाठी तुळजापूर पोलीस ठाण्यालाही देण्यात आली आहे. 

Video

 

Previous Post

तुळजापुरात हाय व्होल्टेज ड्रामा: “मंदिराच्या दगडाला हात लावू देणार नाही,” आव्हाडांच्या इशाऱ्यानंतर भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले

Next Post

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: जिजाऊ चौक परिसरातील १४३ अतिक्रमणे हटवली, रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

Next Post
धाराशिवमध्ये मोठी कारवाई: जिजाऊ चौक परिसरातील १४३ अतिक्रमणे हटवली, रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: जिजाऊ चौक परिसरातील १४३ अतिक्रमणे हटवली, रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group