• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये लहान मुलांच्या भांडणातून जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 11, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरात लहान मुलांच्या भांडणातून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ८ मे २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रियदर्शनी दूध डेअरीच्या पाठीमागे, बालाजी नगर येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी समर्थ दत्ता जाधव (वय २० वर्षे, रा. पापनाश नगर, धाराशिव) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबानुसार, आरोपी लहू चौधरी, अंकुश चौधरी, किशोर सुभाष चौधरी आणि अन्य एक (सर्व रा. बालाजी नगर, शेकापूर रोड, धाराशिव) यांनी ही मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी समर्थ जाधव आणि त्याचा मित्र मारुती शिवाजी इटलकर ( वय १७ ) यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता आणि लाकडी वेळूच्या बांबूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर समर्थ जाधव यांनी १० मे २०२५ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) (प्रोत्साहन देणे), ११८(१) (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवणे), ११५(२) (मृत्यू किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यास प्रोत्साहन देणे, गुन्हा न घडल्यास), ३५२ (गंभीर प्रकोपाशिवाय मारहाण करणे), ३५१(१) (गुन्हेगारी शक्तीचा वापर) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

न्यूज अपडेट – या मारहाणीत जखमी मारुती शिवाजी इटलकर ( वय १७ ) मयत झाला आहे.

सविस्तर बातमी वाचा – धाराशिवमध्ये शाळकरी मुलीच्या छेडछाडीतून तरुणाची हत्या

Previous Post

धाराशिव : शेअर मार्केटमध्ये २० टक्के नफ्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Next Post

परंडा तालुक्यात ट्रॅक्टर मागणीच्या वादातून जमावाचा हल्ला; एकावर गंभीर मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

परंडा तालुक्यात ट्रॅक्टर मागणीच्या वादातून जमावाचा हल्ला; एकावर गंभीर मारहाण

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी जंगलाजवळ तरुण शेतकऱ्याचा गळा चिरून निर्घृण खून

July 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली धाराशिवच्या व्यक्तीला ११.४६ लाखांचा गंडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group