धाराशिव: धाराशिव लाइव्हने सातत्याने केलेल्या पोलखोल मालिकेनंतर अधिष्ठाता डॉ. ना.सु. गंगासागरे आणि बालरोग विभाग प्रमुख डॉ. टी.वाय. स्वामी यांनी आता स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी खोटी प्रसिद्धी देण्याचा सपाटा लावला आहे.
📌 ‘४०० बालकांना सुवर्ण प्राशन’ – खोटा दावा!
गंगासागरे आणि स्वामी यांनी शासनाच्या माहिती कार्यालयाच्या माध्यमातून ‘४०० हून अधिक बालकांना सुवर्ण प्राशन’ केल्याचा दावा केला आहे. मात्र, हा आकडा फुगवण्यात आला असून, प्रत्यक्षात फारतर ४० मुलांना हे देण्यात आले असावे.
📌 ‘बोलाचा भात, बोलाची कढी’ – पुरावे कुठे?
👉 या ४०० बालकांची नावे व यादी कुठे आहे?
👉 पालकांना देण्यात आलेले कोणतेही प्रमाणपत्र किंवा नोंदणी दस्तऐवज आहे का?
👉 हे सुवर्ण प्राशन खरोखरच दिले की फक्त प्रेस नोटमध्ये शून्य वाढवून प्रसिद्धी करण्यात आली?
📌 गंगासागरे आणि स्वामींचे ‘प्रतिमा सुधारण्याचे’ राजकारण!
धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालयातील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर डीन गंगासागरे आणि बालरोग विभाग प्रमुख डॉ. स्वामी यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ‘मोफत सुवर्ण प्राशन शिबिर’ यशस्वी ठरल्याचा बनाव रचला आहे.
📌 वास्तविकता काय?
- हॉस्पिटलमध्ये एक्सरे फिल्म नाही, सोनोग्राफी आठवड्यातून फक्त दोन दिवस असते, औषधे उपलब्ध नाहीत – मग अचानक एवढे मोठे सुवर्ण प्राशन कसे झाले?
- ४०० हून अधिक बालकांची आकडेवारी बोगस असून, प्रशासनाने याची चौकशी करावी.
- हा प्रकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
👉 या प्रकरणावर चौकशी होणार का, की खोटी प्रसिद्धी सुरूच राहणार? धाराशिव लाइव्ह या प्रकरणाचा अधिक तपास करत राहील!