धाराशिव: धाराशिव शहरातील बार्शी नाका ते रेल्वे स्टेशन या ८ किलोमीटरच्या रस्त्याचे काम रखडले आहे. यातील ३ किलोमीटरचा बार्शी नाका ते प्रकाश नगर सिमेंट रस्ता आणि २ किलोमीटरचा प्रकाश नगर ते कोकाटे नगर डांबरी रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र, कोकाटे नगर ते रेल्वे स्टेशन या ३ किलोमीटरच्या रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी अडवले आहे.
या रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिक्रहण न करताच मंजुरी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेतकरी आता रस्ता बांधणीला विरोध करत आहेत. या प्रकरणात सावर्जनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचा आरोपही होत आहे.कोट्यवधी रुपयाचा या कामात कंत्राटदार आणि अधिकारी मालामाल झाले आहेत.
अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम झालेले नाही. थातुरमातुर काम करण्यात आले आहे. सिमेंट रस्त्यावर ड्रेनेजचे चेंबर उघडे पडले आहेत. रस्ता आताच उखडला आहे. अनेक ठिकाणी नाली बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे घरातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे.
रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Video