धाराशिव: धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जबाबदार पालकमंत्र्यांची नेमणूक आवश्यक असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेमावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल काळे यांनी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात काळे बोलत होते. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्याने येथील समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी सक्षम पालकमंत्री नेमणे गरजेचे आहे. शिक्षण, आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांसाठी ठोस निर्णय घेऊन जिल्ह्याला पुढे नेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत महसूल मंत्री बावनकुळे यांची पालकमंत्रीपदी नेमणूक झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असे मत काळे यांनी व्यक्त केले.
Video