• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे…

ड्रायव्हर आणि क्लिनरवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी मर्दुमकी गाजवली

admin by admin
May 22, 2024
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे…
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – कर्नाटक राज्यातून बीड जिल्ह्यात जाणारा गुटखा धाराशिव जिल्ह्यातून वाहतूक केला जातो. बीड जिल्ह्यातील गुटखा तस्करांची सेटिंग केबी करीत होता. पण केबीची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाल्यापासून त्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुटख्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात जाणारा  लाखो रुपयाचा गुटखा धाराशिव पोलिसांनी पकडला आहे, पण याप्रकरणी ड्रायव्हर आणि क्लिनरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य म्होरके मुळे बंधू मात्र नामानिराळे आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पहिली केस

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हुमानाबाद येथून एक अशोक लेलॅड कंपनीचे वाहन (क्र एमएच 44 यु 2405) मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखाची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन त्यांनी नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहन थांबवून चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला.

वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया कॉलनी बीड ता. जि. बीड असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 64 पोते, विमल पान मसाला 5 मोटे पोते, व्ही- 1 तंबाखु एक खाकी रंगाचे पोते, महा रॉयल 717 तंबाखु 32 हिरवट रंगाचे पोते, आओबाजी पान मसाला 15 पोते, रॉयल 220 तंबाखु 14 पोते, हिरा पान मसाला 14 पोते, रॉयल 717 तंबाखु 7 पोते, बॅग, पॉकेट सह अशोक लेलॅड कंपनीचे वाहन क्र एमएच 44 यु 2405 असा एकुण 28, 89, 740 ₹ किंमतीचा माल मिळून आला.

मिळून आलेला जप्त करुन माल सह आरोपी नामे-1) नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, 2) हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया कॉलनी बीड ता. जि. बीड यांना ताब्यात घेवून आरोपी विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 124/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस मालासह मुरुम पोलीसांच्या ताब्यात दिले.

दुसरी केस

धाराशिव शहर पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सोलापूर ते धुळे हायवे रोडवर एक अशोक लेलॅड कंपनीचे (बडा दोस्त) मॉडेलचे वाहन क्र एमएच 44 यु 2405 या मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे. या माहितीवरून पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहनास थांबण्याचा इशारा केला असता नमुद वाहन चालकाने वाहन न थांबवता पुढे निघून गेला. पथकाने त्याचा पाठलाग करुन येडशी ब्रिज ओलांडून बीड कडे जाणारे रोडवर 17.45 वा. सु. सदरचे वाहन थांबवून चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा दिसून आला.

पोलीस पथकाने वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शेख रेहान शेख रहीम, वय 28 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, ता. जि. बीड, शेख अफरोज, पिता शेख बागल, वय 22 वर्षे, रा. मोहमदीया कॉलनी बार्शी नाका बीड, असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 26 पोते, बाबा गुटखा 20 पोते, हिरा गुटखा असलेला पान मसाला 50 पोते, रॉयल जर्दा 220, 20 पोते, रॉयल 717 तंबाखु 13 पोते, रॉयल 220 तंबाखु 25 पोते, असे पोते, बॅग, पॉकेट सह अशोक लेलॅड कंपनीचे वाहन क्र एमएच 44 यु 2405वाहन, एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी क्र एमएच 01 बीटी 6144 व मोबाईल फोन असा एकुण 24, 71, 320 ₹ किंमतीचा माल मिळून आला. मिळून आलेली वाहने व मा जप्त करुन माला सह आरोपी नामे-1) नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, 2) हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया कॉलनी बीड ता. जि. बीड यांना ताब्यात घेवून आरोपी विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुरनं 181/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, 273 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.

मुख्य म्होरके नामानिराळे

मागील आठ दिवसात पकडलेल्या दोन गुटखा प्रकरणी गाडीच्या ड्रायव्हर आणि क्लिनरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मुख्य म्होरके नामानिराळे आहेत.

बीड जिल्ह्यातील गुटखा तस्करांची सेटिंग केबी करीत होता. बीड जिल्ह्यातील मुळे बंधूचे येरमाळा येथून पोलीस मुख्यालयात बदली झालेल्या ‘केबी’ बरोबर आर्थिक संबंध होते. केबी मार्फत जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनच्या कारभाऱ्याना दरमहा पॉकेट पोहच होत होते, पण केबीची पोलीस मुख्यालयात बदली झाल्यापासून बीड जिल्ह्यातील या गुटखा तस्करांचे कंबरडे मोडले आहे. या गुटखा तस्करांवर यापूर्वी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.नव्याने दाखल झालेल्या दोन्ही केसमध्ये पोलीस मुळे बंधूना आरोपी करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

 

Previous Post

तुरोरीत ट्रॅक्टरने धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

Next Post

चोराखळीच्या कालिका कला केंद्रात हाणामारी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

चोराखळीच्या कालिका कला केंद्रात हाणामारी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!