बेंबळी : दि. 04.06.224 रोजी 01.00 वा. सु. पवन माळी रा. ताकविकी यांचे शेताजवळ शिवरस्त्यावर अनोळखी दोन इसम संश्यीतरित्या विना क्रमांकाचे मोटरसायकलवर फिरत असताना फिर्यादी नामे- दुरकस दिगंबर डोलारे, वय 20 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव यांनी व त्यांचा मित्र यांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यातील एका व्यक्तीने काळ्या नळीतुन फिर्यादीचे पाठीवर छरे मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दुरकस डोलारे यांनी दि. 07.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे- नितीन लक्ष्मण सोनटक्के, मुद्रका लक्ष्मण सोनटक्के दोघे रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 07.06.2024 रोजी 12.00 वा. सु. बेंबळी शिवारातील शेतात फिर्यादी नामे- ज्ञानदेव गणपती माने, वय 45 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांना शेतीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानदेव माने यांनी दि. 07.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे- ज्ञानदेव गणपती माने, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव, यांनी दि. 07.06.2024 रोजी 12.00 वा. सु. बेंबळी शिवारातील शेतात फिर्यादी नामे-नितीन लक्ष्मण सोनटक्के, वय 28 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांना बांध टोकरण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कटर व कुळवाचे रुमण्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नितीन सोनटक्के यांनी दि. 07.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.