उमरगा : फिर्यादी नामे- गणेश अमृत लिंबोळे, वय 20 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो कंपनीची ग्लॅमर मोटरसायकल क्र एमएच 12 व्हीएम 3158 ही दि. 03.06.2024 रोजी 21.00 ते दि. 04.06.2024 रोजी 07.00 वा. सु. गणेश लिंबोळे यांच्या राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे गणेश लिंबोळे यांनी दि.07.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-सत्यवान बापुराव सौलाखे, वय 37 वर्षे, रा. चोंदे गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे लॉर्ड विश्वकर्मा ट्रेलर ॲड शेती अवजारे दुकानासमोरील अंदाजे 50,000₹ किंमतीचे जय भारत पेरणी यंत्र हे दि.05.06.2024 रोजी 20.30 ते दि. 06.06.2024 रोजी 09.0 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सत्यवान सौलाखे यांनी दि. 07.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जाळुन नुकसान करुन जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल
धाराशिव :- आरोपी नामे-हणुमंत केशव साळुंके, वय 50 वर्षे, रा. तांबरी विभाग ता. जि. धाराशिव यांनी दि. 01.08.2023 रोजी 10.00 वा. सु. ते दि. 04.06.2024 रोजीचे 01.00 वा. सु. धाराशिव शहरातील रामनगर येथील एक 32 वर्षीय महिलेला नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन घरामध्ये पेट्रोल टाकून घरातील घरगुती सामानाचे व मुलांचे कागदपत्रे जाळुन नुकसान केले. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि.07.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 436, 323, 504 सह अ.जा.ज.अ.प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(व्ही) (टी), 3(1) (आर) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.