भूम :आरोपी नामे- 1) सौरभ कालीदास गोयकर, 2)शंकर युवराज गोयकर, 3) समाधान ताईतराव गोयकर, 4) ओंकार रघुनाथ गोयकर, 5) दिनेश रघुनाथ गोयकर, 6) श्रीकांत अंकुश गोयकर सर्व रा. आरसोली ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 09.01.2024 रोजी 21.00 वा. सु. आरसोली येथील समाधान हिंगमिरे यांचे किराणा दुकानासमोर भुम येथे फिर्यादी नामे-गणेश सुभाष तेलंग, वय 22 वर्षे, रा.आरसोली ता. भुम जि. धाराशिव यांना व त्यांचा चुलत भाउ आदेश आप्पा तेलंग, अनिल गणेश पवार व आकाश बाबासाहेब सोनवणे यांना लग्नाची वरात बघण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप, साखळी, दगडाने मारहाण करुन जखमी केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश तेलंग यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 324, 504, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3 (1)(आर)(एस), 3(2)(व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी :आरोपी नामे- 1)शिवराम उर्फ बबन भंडारे, 2) संगिता शिवराम भंडारे रा. खडकी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.01.2024 रोजी 16.30 वा. सु खडकी येथे समाज मंदीराचे समोर दगडी कट्ट्या जवळ फिर्यादी नामे- सुनिल सुर्यभान नागणे, वय 41 वर्षे, रा. खडकी ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. गुरुवार पेठ सोलापूर ता.जि. सोलापूर यांची गाडी नमुद आरोपींनी थांबवून सत्तुर चा धाक फिर्यादीस दाखवून त आम्हाला व आमच्या बायकांना जेल मध्ये टाकले आहे, तुला आता आम्ही जिवंत सोडणार नाही तु मराठा आरक्षणाचे राज्यभर कसे काम करतो हेच बघतो अशी धमकी दिली. व फिर्यादीस गच्चीला धरुन खाली उतरवले त्यावेळी फिर्यादी यांचे खिशातील एक हजार रुपये कढून घेतले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश तेलंग यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 341, 327, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे- 1)किशोर बिराजदार, रा. जकेकुर, 2) प्रभाकर बिराजदार, रा. हंद्राळ, 3) सलीम शेख, 4) अजिम खजुरे, 5) लक्ष्मण कांबळे, 6) जिंदावली शेख, 7) मशाक फुलारे, 8) गजाप्पा माशाळे, 9)नागेश सोमाणी व इतर इसम यांनी दि.10.01.2024 रोजी 13.30 वा. सु. जकेकुर चौरस्ता उड्डाण पुलाखाली ता. उमरगा जि .धाराशिव येथे गैरकायद्याची मंडळी जमवून केंद्र सरकारने केलेल्या हिट ॲड रन कायद्या अन्वये ड्रायव्हरला 10 वर्षे शिक्षा आहे या कायद्याचा निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्र 65 उमरगा ते जकेकुर व राज्य महामार्ग 548 (ब) खसगी ते नारंगवाडी दोन्ही रस्ते आडवून रास्ता रोको करुन मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रणजीत रामचंद्र आडे, वय 36 वर्षे, पोलीस अमंलदार-1746 नेमणुक पोलीस ठाणे उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 341, 143, 34 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 (1) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे- 1)बाळु कुमार झोंबाडे, 2) कुमार झोंबाडे दोघे रा. पापनाश नगर तिर्थ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.01.2024 रोजी 11.30 वा. सु. राम गायकवाड यांचे घरासमोर पापनाश तिर्थ तुळजापूर येथे फिर्यादी नामे- किरण सुनिल घाटशिळे, वय 29 वर्षे, रा. पापनाश नगर तिर्थ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपी हे दारु पिवून रोडवर उभे असताना फिर्यादी यांनी गाडीचा हॉर्न वाजवण्याचे कारणावरुन नमुद आरेापींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-किरण घाटशिळे यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे- 1)विश्वनाथ मारुती ढेकणे, 2) जयश्री विश्वनाथ ढेकणे, 3) सचिन विश्वनाथ ढेकणे सर्व रा. गोपाळवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 09.01.2024 रोजी 15.00 वा .सु. गोपाळवाडी येथे फिर्यादी नामे- वैशाली दयानंद ढेकणे, वय 33 वर्षे, रा. गोपाळवाडी ता. जि. धाराशिव यांना नळाला पाणी भरण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी माराहण करुन भिंतीवर ढकलून देवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैशाली ढेकणे यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.