धाराशिव – शहरातील भोसले हायस्कुलचे प्राध्यापक विनोद गौतम आंबेवाडीकर यांनी मौजे धाराशिव हद्दीतील सर्वे नंबर २०/४ मधील भुखंड क्रमांक १९ वर अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यानंतर धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव येथील नगर परिषदेच्या रचना सहायक सचिन राजेंद्र गुंजाळ यांनी दिनांक ५ ऑगस्ट, २०२४ रोजी शहर पोलीस स्टेशन येथे एक तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, विनोद गौतम आंबेवाडीकर यांनी मौजे धाराशिव हद्दीतील सर्वे २०/४ मधील भुखंड क्रमांक १९ वर अनधिकृत बांधकाम केले आहे.
यापूर्वी, बाळासाहेब वसंतराव सुभेदार यांनी दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, नगर परिषदेने आंबेवाडीकर यांना बांधकाम परवान्याचे कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. तथापि, आंबेवाडीकर यांनी कागदपत्रे सादर केली नसल्याने आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत आवश्यक असलेल्या परवानग्या न घेतल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी सचिन गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५६ (६) (अ) अंतर्गत विनोद आंबेवाडीकर यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, आंबेवाडीकर यांनी धाराशिव येथील सर्वे नंबर २०/४ मधील भुखंड क्रमांक १९ या जागेवर अनाधिकृत बांधकाम केले होते. याबाबत सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी नगर परिषदेकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत नगर परिषदेने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. चौकशी अंती, आंबेवाडीकर यांनी नगर परिषदेकडून बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी नगर परिषदेने आंबेवाडीकर यांना अधिकृत नोटीस बजावून अनाधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस दिली होती. परंतु, . आंबेवाडीकर यांनी या नोटीशीकडे दुर्लक्ष करून नोटीसचे पालन केले नाही. त्यामुळे, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५६ (६) (अ) अन्वये त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विनोद गौतम आंबेवाडीकर हे भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. ते उच्चशिक्षित असूनही अनधिकृत बांधकाम करून, कायदा धुळीला मिळवला आहे.