धाराशिव: धाराशिव बसस्थानकावर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमा यशवंत कुलकर्णी (वय ८०, रा. गणपती गल्ली, अंबड, जि. जालना) या १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास धाराशिव बसस्थानकावरून कळंबला जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरीला गेली.
याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ गोविंद गायकवाड (वय ३३, रा. औरंगपूर, ता. शिरुर, जि. बीड) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमा कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर पोलिसांनी साईनाथ गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. सध्या आरोपीकडून सोनसाखळी जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.