• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास

admin by admin
October 5, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यातील वाशी, येरमाळा, तुळजापूर आणि ढोकी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या चार वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये विद्युत तार, ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य तसेच दुचाकी असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाशी पोलीस ठाणे : गोलेगाव शिवारात सुरू असलेल्या पीएसएस टू केटी-03 पॉईंटवरील ए-59 ईको पॅथ्र कंडक्टर ॲल्युमिनियमची सुमारे 1,500 मीटर व 3,000 मीटर अशी एकूण 4,000 मीटर विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 ते सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरीस गेलेल्या मालाची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे. राहुल मोहन पिसाळ यांच्या फिर्यादीवरून 4 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

येरमाळा पोलीस ठाणे : दुधळवाडी येथील शेतकरी संतोष केशव लाटे यांच्या गट क्रमांक 307 मधील ट्रान्सफॉर्मर फोडून चोरट्यांनी त्यातील वायडिंग कॉईल व सुमारे 220 लिटर ऑईल चोरी केले. वायडिंग कॉईलची किंमत सुमारे 40 हजार रुपये, तर ट्रान्सफॉर्मरची तोडफोड केल्याने सुमारे 67 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे. अजय नंदकिशोर कवडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे : तुळजापूर शहरातील आठवडी बाजार रोडवरील राज पॅलेसजवळून विश्वजीत बसप्पा कदम यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्रमांक एमएच 25 एव्हाय 4042) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. दुचाकीची किंमत सुमारे 40 हजार रुपये असून, याप्रकरणी 4 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

ढोकी पोलीस ठाणे : बावी-ढोकी शिवारातील गट क्रमांक 85 मधील शासकीय जागेवर असलेल्या इन्फिसोल एनर्जी लिमिटेडच्या साईटवरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2,900 मीटर ॲल्युमिनियम वायर चोरून नेली. 26 सप्टेंबर रोजी पहाटे 1 ते 5 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरीस गेलेल्या वायरची किंमत सुमारे 75 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. साईट इंजिनिअर प्रशांत लक्ष्मण सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चारही प्रकरणांमध्ये भा.न्या.सं. कलम 303(2) तसेच संबंधित प्रकरणात कलम 324(4) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Previous Post

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Next Post

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास

October 5, 2026
खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास
  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!