• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

दोघांवर शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

admin by admin
October 7, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव शहरातील जवाहर कॉलनी परिसरात असलेल्या एसटी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका ७८ वर्षीय वृद्धाला विनाकारण अश्लील शिवीगाळ करत दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

जवाहर कॉलनी, जीएसटी कार्यालयाच्या पाठीमागे (धाराशिव) येथील रहिवासी रमेश परशुराम सरकाळे (वय ७८ वर्षे) हे २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास जवाहर कॉलनीतील एसटी कार्यालयाच्या गेटजवळून जात होते.

त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दोन संशयितांनी वृद्धाला अडवून विनाकारण अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जमिनीवरील दगडाने डोक्यात व अंगावर जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. या अमानुष व प्राणघातक मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रमेश सरकाळे यांचा मृत्यू झाला.

धाराशिव शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद

वडिलांच्या हत्येनंतर मुलगा योगेश रमेश सरकाळे (वय ३६ वर्षे, रा. जवाहर कॉलनी, धाराशिव) यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

  • आरोपी :

    १) लखन माळी (रा. तांबरी विभाग, धाराशिव)

    २) सुखदेव कदम (रा. धाराशिव)

  • दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५).

दिवसाढवळ्या एका ७८ वर्षीय वृद्धाची दगडाने मारून हत्या करण्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!