धाराशिव :आरोपी नामे- 1)प्रतापसिंह शेंडगे, 2) विवेक निंबाळकर, 3) विघ्नहर्ता चौरे, 4)हर्षल नरवडे,5)ऋषी शेंडगे सर्व रा. धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.01.01.2024 रोजी 06.30 वा. सु. रामराजे चौक धाराशिव येथे फिर्यादी नामे- श्वेत सुनिल चिलवंत, वय 18 वर्षे रा. अजिंठानगर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी ‘ये महारांनो ईकडे या तुम्ही लय माजलात काय’ असे म्हाणून बोलावून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्वेत चिलवंत यांनी दि.01.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ. प्र कायदा कलम 3(2),व्हिए), 3(1), (आर) 3(1) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्गमध्ये मारहाण
नळदुर्ग :आरोपी नामे- 1) अविनाश अकुंश चव्हाण, रा. मुर्टा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी 15.30 वा. सु. शेत गट नं 79 मध्ये अलियाबाद शिवार येथे फिर्यादी नामे-सुर्वणा महादेव चव्हाण, वय 38 वर्षे, रा. मुर्टा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने शेतातील पिकाला पाणी देण्याचे कारणावरुन कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुर्वणा चव्हाण यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
भूम : भुम पो.ठा. चे पथक दि. 31.12.2023 रोजी 23.00 वा. सु. भुम पो.ठा. हद्दीत भुम समोरील मोकह्या जागेत यात्रेकरुचे मनोरंजनासाठी लावलेल्या पाळण्याचे ठिकाणी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना भुम ता. भुम जि.धाराशिव येथील- गणेश बापू जाधव, वय 21 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे लोखंडी धारदार एक कोयता बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील त्या एक लोखंडी कोयता जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.