उमरगा : फिर्यादी नामे- सदानंद वामनराव कुंभार, वय 47 वर्षे, रा. बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना दि. 14.11.2023 रोजी 20.30 वा. सु. अनोळखी इसमाने मोबाईल नंबर-8709791113 वरुन फिर्यादीचा मोबाईल नंबर 9421445683 वर फोन करुन तुमचे विज बिल थकीत आहे थकीत बील भरण्यासाठी टीम हे ॲप डाउनलोड करण्यास सांगून पाडून ओटीपी नंबर घेवून फिर्यादी यांचे एस. बी.आय. बॅक खाते क्र 37909305419 व एच.डी.एफ.सी. बॅक क्र 50100671672154 मधून 25,000₹ ऑनलाईन काढून घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सदानंद कुंभार यांनी दि.01.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 420 भा.दं.वि.सं. आय. टी ॲक्ट कलम 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शेळ्यांची चोरी
तुळजापूर : फिर्यादी नामे-डॉ विजयकुमार श्रावण जाधव, वय 49 वर्षे, रा. कृषीविज्ञान केंद्र लातुर रोड तुळजापूर जि. धाराशिव यांचे पशुविज्ञान केंद्र तुळजापूर शिवारातील शेळीपालन गोडाउनचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01.01.2024 रोजी 02.00 ते 05.00 वा.सु तोडून गोडाउन मधील 9 शेळ्या व 2 बोकड असे एकुण 1,95,000₹ किंमतीचे पशुधन चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- डॉ. विजयकुमार जाधव यांनी दि.01.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 461,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.