तामलवाडी : मयत नामे-दशरथ होनप्पा जोगन, वय 45 वर्षे, रा. हडगली ता. आळंद जि. कलबुर्गी हे दि.28.12.2023 रोजी 03.00 ते 03.15 वा. सु. सरस्वती मंगल कार्यालय तामलवाडी समोरुन येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून दशरथ जोगन यांना धडक दिली.
या अपघातात दशरथ जोगन हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक हा आपघाताची माहिती न देता आपघात स्थळावरुन वाहनासह पासार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी नामे- चनाम्मा दशरथ जोगन, वय 40 वर्षे, रा. हडलगी ता. आळंद जि. कलबुर्गी ह.मु. वडोली उंब्रज ता. कराड जि. सातारा यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-1) बाळु हरिभाउ जाधव, वय 31 वर्षे, रा. साईनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.30.12.2023 रोजी 20.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 डी 7352 ही आरोग्य कार्नर येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. तर 2) तिरुपती मच्छिंद्र मुरमे, वय 38 वर्षे, रा. जुनी पेठ, ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.31.12.2023 रोजी 16.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 13 ए डब्ल्यु 3259 ही हैद्राबाद रोडवर डिवायडरच्या दक्षिण बाजूस उमरगा येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी : आरोपी नामे-1) प्रमोद शंकर केळे, वय 27 वर्षे, रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.30.12.2023 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 14 बीई 0629 ही सरमकुंडी फाटा ते मुख्य चौकात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले.तर 2) सुरज प्रदीप सुकटे, वय 29 वर्षे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.31.12.2023 रोजी 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 14 एफवाय 6302 ही पारा चौक वाशी येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी : आरोपी नामे-1) महेश राजेंद्र कोळगे, वय 30 वर्षे, रा. उमरेगव्हाण ता. जि. धाराशिव, हे दि.31.12.2023 रोजी 21.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एएम 3084 ही उमरेगव्हाण चौकात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
कळंब : आरोपी नामे-1)सचिन अर्जुन बानगुडे, वय 36 वर्षे, रा. वाकडी ता. परंडा जि.धाराशिव, 2)दिपक रामेश्वर चंदनशिवे, वय 36 वर्षे, रा. भोपळा ता. केज जि. बीड, हे दोघे दि.31.12.2023 रोजी 15.30 ते 16.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे पिकअप क्र एमएच 25 एजे 2436 वछोटा हत्ती क्र एमएच 04 एफपी 1031 हे बसस्थानक कळंब व होळकर चौक कळंब येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.