• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दागिन्यांसह दुचाकी आणि तब्बल पावणेपाच लाखांच्या म्हशी लांबवल्या

admin by admin
May 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, विविध ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनांत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, एक दुचाकी आणि चक्क सात म्हशी असा एकूण ५ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कळंब, तुळजापूर आणि शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कळंब बसस्थानकातून सोन्याचे गंठण लंपास

कळंब बसस्थानक परिसरातून एका महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे आणि २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत हातोहात लांबवले. मनीषा नवनाथ वाघमारे (वय ४३, रा. वडगाव सिद्धेश्वर, जि. धाराशिव) या दि. २७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कळंब ते सोलापूर बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. या प्रकरणी त्यांनी ३० एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तुळजापुरातून दुचाकीची चोरी

दुसऱ्या घटनेत तुळजापूर शहरातील बारलिंग मंदिराजवळून एका शेतकऱ्याची दुचाकी चोरीला गेली आहे. त्रिंबक दादाराव डोलारे (वय ३८, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) यांची ४० हजार रुपये किमतीची ‘एचएफ डिलक्स’ मोटरसायकल (क्र. एमएच २५ एक्यू ३८४८) दि. २९ एप्रिल रोजी दुपारी सव्वादोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पळवली. याप्रकरणी डोलारे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसाढवळ्या शेतातून तब्बल ७ म्हशींची चोरी

सर्वांत मोठी चोरीची घटना शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. करंजकल्ला (ता. कळंब) येथील शेतकरी पांडुरंग शिवलिंग कोरे (वय ५५) यांच्या शेत गट क्र. १२५ मधून त्यांच्या ६ आणि त्यांच्या पुतण्याची १ अशा एकूण ७ म्हशी चोरून नेण्यात आल्या. या म्हशींची अंदाजे किंमत ४ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी पांडुरंग कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कालिदास राजाभाऊ गाढवे, दादा उमाराव पवार (दोघे रा. भाटशिरपुरा, ता. कळंब) आणि दीपक दत्ता पवार (रा. जवळा पारधी पेढी, ता. कळंब) या तीन आरोपींविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही घटनांचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Previous Post

सुनील बनसोडे यांचे ‘घंटानाद’ आंदोलन मागे; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता

Next Post

बांधकाम कामगार कल्याण मंडळात ६ हजार बोगस कामगारांची नोंदणी; कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post
बांधकाम कामगार कल्याण मंडळात ६ हजार बोगस कामगारांची नोंदणी; कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

बांधकाम कामगार कल्याण मंडळात ६ हजार बोगस कामगारांची नोंदणी; कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!