• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बांधकाम कामगार कल्याण मंडळात ६ हजार बोगस कामगारांची नोंदणी; कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना दिले निवेदन; ग्रामसेवकांसह दलालांची चौकशी करण्याची मागणी

admin by admin
May 1, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
बांधकाम कामगार कल्याण मंडळात ६ हजार बोगस कामगारांची नोंदणी; कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
601
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी धाराशिवमध्ये आलेले राज्याचे परिवहन व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना आज (१ मे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळबळजनक निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात तब्बल ६ हजार बोगस कामगारांची नोंदणी झाल्याचा आरोप मनसेने केला असून, याप्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मनसेचे धाराशिव शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात मोठा घोटाळा सुरू आहे. धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी आणि जुनोनी या ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक आणि काही दलाल व एजंट यांनी संगनमत करून, बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून तब्बल ६००० बोगस कामगारांची नोंदणी केली आहे.

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही कारवाई शून्य

या संपूर्ण बोगस नोंदणी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकांवर आणि धाराशिव जिल्ह्यातील दलालांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जिल्हा कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सात दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

मनसेचा आंदोलनाचा इशारा

जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याने आता थेट पालकमंत्र्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. प्रशासनाने आणि शासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ कारवाई न केल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी दिला आहे.

Previous Post

जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दागिन्यांसह दुचाकी आणि तब्बल पावणेपाच लाखांच्या म्हशी लांबवल्या

Next Post

धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक: भगव्या ध्वजावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले..

Next Post
धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक: भगव्या ध्वजावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले..

धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक: भगव्या ध्वजावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले..

ताज्या बातम्या

उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

July 31, 2026
औराद येथील वायर चोरीत घंटागाडीचा वापर; नगराध्यक्ष किरण गायकवाड ॲक्शन मोडवर!

औराद येथील वायर चोरीत घंटागाडीचा वापर; नगराध्यक्ष किरण गायकवाड ॲक्शन मोडवर!

July 31, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

July 31, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा नगर परिषद प्रशासन बॅकफूटवर! औराद येथील वायर चोरीच्या प्रकरणात कचरा गाडीचा संशयास्पद वापर

July 31, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

औराद येथे विजेची वायर लांबवणाऱ्या ३ भामट्यांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

July 31, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!