• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बहिणीच्या लग्नात सर्वांच्या पुढे का नाचलास? क्षुल्लक कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील घटना; चार जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : चुलत बहिणीच्या लग्नात सगळ्यांच्या पुढे का नाचत होतास? या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत त्याच्यावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील सरणवाडी येथे घडली. हा प्रकार बुधवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी गुरुवारी (ता. १४) परंडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक भारत जाधव (वय ३०, रा. सरणवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सरणवाडी येथील सूर्यकांत कदम यांच्या घराजवळ दीपक जाधव हे असताना, आरोपी विशाल अर्जुन साबळे, वैभव लक्ष्मण जाधव, गणेश लक्ष्मण जाधव आणि लक्ष्मण धर्मा जाधव (सर्व रा. सरणवाडी) हे त्याठिकाणी आले. त्यांनी दीपक यांना, ‘तू तुझ्या चुलत बहिणीच्या लग्नात सगळ्यांच्या पुढे का नाचत होतास?’ असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.

याच कारणावरून चिडलेल्या आरोपींनी दीपक यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, सोबत आणलेल्या लोखंडी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर दीपक जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. १४) आरोपी विशाल साबळे, वैभव जाधव, गणेश जाधव आणि लक्ष्मण जाधव या चारही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Previous Post

इटकळमध्ये दुचाकीच्या वादातून दोन गटांत राडा; नळदुर्ग पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post

घरात घुसून तलवार आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला; आनाळा येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

घरात घुसून तलवार आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला; आनाळा येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!