• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कारसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

तुळजापूर, ढोकी, धाराशिव, उमरगा आणि मुरुम पोलिसांत गुन्हे दाखल

admin by admin
May 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, वेगवेगळ्या पाच ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सात लाख रुपये किमतीच्या कारसह, सोन्या-चांदीचे दागिने, सोलर प्रकल्पाची केबल, ट्रॅक्टरचे साहित्य आणि विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर असा एकूण नऊ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या सर्व प्रकरणांत गुरुवारी (ता. १४) जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तुळजापुरातून सात लाखांची कार चोरीला

तुळजापूर येथील साळुंके गल्लीतील रहिवासी जितेंद्र मधुसूदन भुमकर (वय ५६) यांच्या भाच्याची ‘मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर’ (एमएच १२ एके ६३११) ही कार अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. या कारची किंमत सात लाख रुपये आहे. याप्रकरणी जितेंद्र भुमकर यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ढोकीत सोलर प्रकल्पाची केबल लंपास

ढोकी येथील सर्व्हे क्र. ६२ मधील ‘७ एमव्ही’ सोलर प्रोजेक्टमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. दि. ८ मे रोजी मध्यरात्री १.३० ते २ वाजेच्या सुमारास १२ इन्व्हर्टरचे अर्थिंग केबल (अंदाजे २४५ फूट) असा ७० हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. तसेच, डीसी रेड आणि डीसी ब्लॅक केबल तोडून नुकसान केले. याप्रकरणी ज्ञानेश्वर मोहन केंचे (वय ३५, रा. ढोकी) यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून ढोकी पोलिसांत भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भानसगाव येथे घरातून दागिने व मोबाईलची चोरी

धाराशिव तालुक्यातील भानसगाव येथे किरण बबन लोंढे (वय ३२) यांच्या घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून दि. ११ मे रोजी पहाटे ३ ते ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील मोबाईल, पॉवर बँक, टायटन घड्याळ, १२ ग्रॅम सोन्याचे व २२ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०५(ए) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

एकुरगावाडीत ट्रॅक्टरचे साहित्य चोरीला

उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील राम ईश्वर सोलगे (वय ६८) यांच्या ट्रॅक्टरचे (एमएच २५ एच ७६२९) महत्त्वाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. यामध्ये बॅटरी, हायड्रोलिक मांड्या सेट, रोटर शाफ्ट, चॅनल हुक, साखळ्या, स्टार्टर, सीट आणि एअर क्लिनर असा ४० हजार रुपये किमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. राम सोलगे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरुम उपकेंद्रातून ट्रान्सफॉर्मर चोरीला

मुरुम येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रातून चोरट्यांनी ४५ हजार रुपये किमतीचे ९ ‘सिटी ११ केव्ही करंट ट्रान्सफॉर्मर’ चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. २३ ते २४ एप्रिल आणि ४ ते ५ मे या कालावधीत ही चोरी झाली. खाजगी नोकरी करणारे बशीर अहमद इसाक जमादार (वय ५३, रा. यशवंत नगर, मुरुम) यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Previous Post

घरात घुसून तलवार आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला; आनाळा येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!