• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : ४ गुन्हे उघडकीस, ४ आरोपींना अटक

admin by admin
May 16, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : जिल्ह्यातील तुळजापूर आणि येरमाळा येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक महिलांच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील दागिने व मणिमंगळसूत्र चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि एका वाहनासह तब्बल ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

१ मे २०२६ रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अज्ञातांनी चोरून नेले होते. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (भान्यांसं) कलम ३०३ (२) अन्वये अनोळखी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे वाढल्याने आणि त्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांची तातडीने उकल करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, १५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कासार आणि त्यांच्या पथकाला गोपनीय खबऱ्याकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशी येथील पारगाव टोल नाक्यावर सापळा रचून एका स्कॉर्पिओ वाहनासह (Mahindra Scorpio) दोन संशयित महिला आणि दोन पुरुषांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने तुळजापूर आणि येरमाळा येथे भाविक महिलांचे गंठण व मणिमंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.

या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीअंती तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेला एक आणि येरमाळा पोलिस ठाण्यातील तीन असे एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :

१. अनिता सुनील शिंदे

२. हिराबाई रमेश शिंदे

३. चिरंजीव रमेश शिंदे

४. किरण शेषेराव शिंदे

(सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना)

पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक करण्यात आलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलिस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, महिला पोलिस हवालदार शोभा बांगर, महिला पोलिस अंमलदार बहिरवाड (वाशी पोलिस ठाणे), चालक पोलिस हवालदार रत्नदीप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कारसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post

 डॉल्बीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण; पोलिसांच्या ताब्यातून डीजेचे वाहन पळवले

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

 डॉल्बीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण; पोलिसांच्या ताब्यातून डीजेचे वाहन पळवले

ताज्या बातम्या

वर्षात फक्त ‘स्थगिती’ दिसली, ‘प्रगती’ नाही! : तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’

August 26, 2026
भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!

‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!

August 26, 2026
ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

August 26, 2026
तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’
  • ‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!
  • ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!
  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!