• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, March 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी : शेंडी शिवारात दरोड्याचा डाव उधळला; पाच जणांच्या टोळीला बेड्या

admin by admin
March 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
59
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : तालुक्यातील शेंडी शिवार परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गस्तीवर असलेल्या वाशी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. या टोळीकडून दोन दुचाकी, घातक शस्त्रे आणि तिखट पावडर असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.

बबन रंगनाथ शिंदे, लहु आबा शिंदे, तानाजी अशोक काळे, सोनु बबन शिंदे आणि सुभाष शिवाजी शिंदे (सर्व रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

वाशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडी शिवारातील कमळेश्वर पारधी पिढीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ काही जण संशयास्पद हालचाली करत असल्याची आणि दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पूर्ण तयारीनिशी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री साडेअकरा ते गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीत बसलेल्या पाचही जणांना पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतले.

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. यामध्ये दोन मोटारसायकली (एमएच २५ बीडी १३१० आणि एमएच २५ एआर ६३२०), चार लोखंडी कोयते, एक तलवार आणि लोकांच्या डोळ्यात फेकण्यासाठी कॅरीबॅगमध्ये आणलेली तिखट पावडर असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम वसंतराव यादव (बक्कल नं. १५१६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता. १२) वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१० (४), (५) सह शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या टोळीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांत सहभाग आहे का, याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.


Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अर्चना पाटील अध्यक्ष, तर उषाताई गायकवाड उपाध्यक्षपदी विराजमान!

Next Post

कळंबमध्ये दरोड्याचा मोठा डाव उधळला; १८ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, १२ आरोपी निष्पन्न

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंबमध्ये दरोड्याचा मोठा डाव उधळला; १८ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, १२ आरोपी निष्पन्न

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम : ऊसतोडीच्या उचलीवरून मारहाण; जाचाला कंटाळून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंबमध्ये दरोड्याचा मोठा डाव उधळला; १८ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, १२ आरोपी निष्पन्न

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाशी : शेंडी शिवारात दरोड्याचा डाव उधळला; पाच जणांच्या टोळीला बेड्या

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group