धाराशिव – धाराशिव बसस्थानकाच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी चार रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:15 ते 11:35 या वेळेत बसस्थानकाच्या आउट गेटजवळ काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा रहदारीस धोकादायक रित्या उभ्या केल्या होत्या. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी रिक्षा क्रमांक एमएच 25 एके 1043, एमएच 25 एके 2079, एमएच 25 एके 1109 आणि एमएच 25 एके 1786 च्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींची नावे:
- रोहित मनोज भडकवाड (वय 26, रा. भवानी नगर)
- बिलाल सिराज पठाण (वय 47, रा. सुरी गल्ली)
- आदित्य जीवन कांबळे (वय 20, रा. अमृत नगर)
- भारत शिवाजी खैरे (रा. जुनोनी)
या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू आहे.