धाराशिव : दि. 05.06.2024 रोजी 18.30 ते दि. 06.06.2024 रोजी 10.00 वा. सु. सधन कुक्कुट विकास गट रामनगर धाराशिव ता. जि. धाराशिव येथील कार्यालयातील स्टोअररुमचे दरवाज्याचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन स्टोररुममधील मराठ टंकलेखन मशीन, इंग्रजी टंकलेखन मशीन, इलेक्ट्रीक मोटार 3 एचपी, इलेक्ट्रीक मोटार 7 एचपी, एम व्हीडीआर असा एकुण 18, 500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-डॉ वैभव मोहन पाटील, वय 37 वर्षे, रा.बॅक कॉलनी धाराशिव यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-अनुज कुमार गजेंद्र कुमार सिंह, वय 22 वर्षे, रा. उत्तरप्रदेश ता. सरदना जि. मेरठ ह.मु. सांजा रोड धाराशिव यांची अंदाजे 40,000₹किमंतीची हिरो होंडा काळ्या रंगाची युपी 15 डीएम 7439 ही दि. 02.06.2024 रोजी 01.30 ते 04.00 वा. सु. सांजा रोड धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनुज कुमार सिंह यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे-बाळु आगतराव कोळेकर, वय 36 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा शईन कंपनीची मोटरसायकल क्रएमएच 25 एझेड 3991 ही दि. 19.05.2024 रोजी 17.00 ते 18.00 वा. सु. तेर ते ढोराळा जाणारे रस्ता असलेल्या कदम यांचे शेताजवळुन तेर शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळु कोळेकर यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : दि.22.04.2024 रोजी 22.30 ते दि. 23.04.2024 रोजी 01.20 वा. सु. सोलार सिस्टीम प्रा. लि. गौरगाव ता. कळंब येथील साईडवरचे जमिनीमध्ये पुरलेले स्ट्रिंग केबल तसेच जोडलेले साहित्य असा एकुण 1,61,000₹ चा माल हा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरज विलास गडाख,वय 31 वर्षे, व्यवसाय साईट इन्चार्ज एम्प सोलार सिस्टम प्रा. लि. गौरगाव, ता. कळंब रा. देवपुर ता. सिन्नर, जि. नाशिक, ह.मु. मुरुड ता. जि. लातुर यांनी दि. 06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.