कळंब : मयत नामे- शामसुंदर अविनाश खापे, रा. हासेगाव के, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.26.05.2024 रोजी 23.30 वा. सु.एनएसएआई पतसंस्थेची पिग्मी गोहा करुन परत गावी हासेगाव येथे टिव्हीएस मोटरसायकलवरुन जात होते. दरम्यान कळंब ते येरमाळा रोडवरील एचपी पेट्रोलपंप समोर हासेगाव शिवार येथे मोटरसायकल क्र एमएच 11 ए जे 8351 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून शामसुंदर खापे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात शामसुंदर खापे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शरद अविशान खापे, वय 42 वर्षे, रा. हसेगाव के, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : मयत नामे-प्रकाश एकनाथ शिंदे, वय 55 वर्षे, रा. वाकडी केज, ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 04.06.2024 रोजी 21.00 वा. सु. होळकर चौक कळंब येथुन पायी जात होते दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 44 एसी 8182 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून प्रकाश शिंदे यांना धडक दिली. या अपघातात प्रकाश शिंदे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे-प्रविण प्रकाश शिंदे, वय 32 वर्षे, रा. वाकडी केज ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.06.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.