• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. खंडेराव चौरे

उपाध्यक्षपदी अ‍ॅड. नन्नवरे, अ‍ॅड. मुंडे-पाटील विजयी; न्यायालय परिसरात गुलालाची उधळण

admin by admin
May 5, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. खंडेराव चौरे
0
SHARES
460
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. खंडेराव हरिश्चंद्र चौरे यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी अ‍ॅड. सुधाकर तांबे यांचा तब्बल १९८ मतांनी पराभव करत विजयश्री संपादन केली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात गुलाल उधळून एकच जल्लोष केला.

जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन कार्यकारिणीसाठी यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. काही जागा बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष (सर्वसाधारण), उपाध्यक्ष (महिला राखीव) आणि महिला प्रतिनिधी अशा प्रमुख चार पदांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यात अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, मुख्य लढतीत अ‍ॅड. खंडेराव चौरे यांनी वर्चस्व सिद्ध केले. अ‍ॅड. चौरे यांनी १९८ मताधिक्य घेत अध्यक्षपदाला गवसणी घातली, तर पराभूत उमेदवार अ‍ॅड. तांबे यांना १३४ मते मिळाली. नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. चौरे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असून, पक्षातील एक सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

इतर पदांवरील निकाल दृष्टिक्षेपात:

  • उपाध्यक्ष (सर्वसाधारण): या पदासाठी अ‍ॅड. सुधीर विठ्ठलराव नन्नवरे आणि अ‍ॅड. इंद्रजित चिंतामणराव शिंदे यांच्यात लढत झाली. एकूण ५१४ मतांपैकी अ‍ॅड. नन्नवरे यांनी तब्बल ४१४ मते घेत एकतर्फी विजय मिळवला. अ‍ॅड. शिंदे यांना केवळ ७८ मतांवर समाधान मानावे लागले. अ‍ॅड. नन्नवरे हे ३३६ मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले.

  • उपाध्यक्ष (महिला राखीव): या पदासाठी अ‍ॅड. सारिका नागनाथ मुंडे-पाटील आणि अ‍ॅड. उज्वला गोरख इंगळे यांच्यात थेट लढत झाली. एकूण ५१९ वैध मतांपैकी अ‍ॅड. मुंडे-पाटील यांनी २९५ मते मिळवत अ‍ॅड. इंगळे (२०२ मते) यांचा ९३ मतांनी पराभव केला.

  • महिला प्रतिनिधी: या लक्षवेधी लढतीत अ‍ॅड. अर्चना रामहरी नवले यांनी जोरदार बाजी मारली. त्यांनी अ‍ॅड. मायादेवी सुभाष सरवदे यांचा तब्बल २१४ मतांनी मोठ्या फरकाने पराभव करत विजय खेचून आणला.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. नितीन भोसले यांनी चोख कामकाज पाहिले. दरम्यान, विजयाची अधिकृत घोषणा होताच सर्व विजयी उमेदवारांचा समर्थकांकडून सत्कार करण्यात आला. गुलालाची मुक्त उधळण करत व पेढे वाटून वकिलांनी हा विजयोत्सव साजरा केला.

Previous Post

पिंपरखेड शिवारात दहशत माजवण्याच्या तयारीत असलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात; लोखंडी कोयता जप्त

Next Post

धाराशिव: आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप; सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता

Next Post
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव: आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप; सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सासूकडून २० लाख आणण्यासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण; चाकूसह टॉमीने बेदम मारहाण, कळंबमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

May 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पार्डी फाट्यावर दारूच्या नशेत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दहशत; पुण्यातील तरुणावर वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

May 12, 2026
कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

May 12, 2026
आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

May 12, 2026
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना कळंबचा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; दुसरा फरार

May 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group