• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

admin by admin
September 3, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यातील उमरगा, कळंब, धाराशिव शहर आणि तुळजापूर येथे चोरीच्या चार स्वतंत्र घटना घडल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर व पत्रे उचकटून रोख रक्कम व साहित्य लंपास केले, तर दोन ठिकाणी दुचाकी व मोबाईल चोरीला गेला. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमरगा : दुकानाचे शटर उचकटून १५ हजारांची चोरी

उमरगा येथील आर्यन स्टिल, चिंचोळे यांच्या महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने उचकटून दुकानात प्रवेश केला. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्याने काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सुरेशकुमार फुलचंद परमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३४(१), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब : पान स्टॉलमधून ८ हजार ३४४ रुपयांचा माल चोरीला

येरमाळा-कळंब मार्गावर मानधने पेट्रोल पंपासमोरील ७/१२ पान स्टॉलचा पत्रा कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. १ सप्टेंबर रात्री आठ ते २ सप्टेंबर सकाळी नऊ या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी बिस्कीट, शेंगदाणा चक्की, चिप्स, चॉकलेट, नमकीन-कुरकुरे तसेच स्प्राईट आणि थम्सअपचे बॉक्स असा एकूण ८ हजार ३४४ रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी आश्रुबा मस्सा राऊत यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाराशिव : एलपीजी गॅस पंपाजवळून ५० हजारांची दुचाकी लंपास

धाराशिव शहरातील सांजा रोडवरील भवानी चौक परिसरात एलपीजी गॅस पंपाजवळ उभी केलेली हिरो युनिकॉर्न मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. एमएच २५ बीई ४१५७ क्रमांकाची सुमारे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी २१ ऑगस्टच्या रात्री ११ ते २२ ऑगस्टच्या पहाटे पाच या कालावधीत चोरीला गेली. याप्रकरणी प्रतिक पांडुरंग आटपाडे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तुळजापूर : आठवडी बाजारातून ४० हजारांचा मोबाईल चोरीला

तुळजापूरच्या आठवडी बाजारातून सोनाली अविनाश जाधव यांचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी सोनाली जाधव यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू आहे.

Previous Post

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

Next Post
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!