• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

देवाला निरोप, पण कार्यकर्त्यांची रिल्सवर जुंपली! धाराशिवच्या मिरवणुकीत राजकीय फड !

admin by admin
September 7, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
देवाला निरोप, पण कार्यकर्त्यांची रिल्सवर जुंपली! धाराशिवच्या मिरवणुकीत राजकीय फड !
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – एकीकडे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा भावनिक गजर… आणि दुसरीकडे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा डिजिटल धुरळा! धाराशिव शहराने शनिवारी पार पडलेली गणेश विसर्जन मिरवणूक या दोन्ही दृश्यांची साक्षीदार ठरली. बाप्पाला निरोप देताना धाराशिवकरांचे डोळे पाणावले होते, पण राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘रिल्स’च्या खेळामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

झाले असे की, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील मंडळांना आकर्षित करण्यासाठी ‘शिस्तबद्ध मिरवणुकी’साठी मोठमोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. पण गंमत म्हणजे, ज्यांनी शिस्तीचे धडे दिले, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचा कळस गाठला.

शहराच्या प्रमुख चौकात, एकमेकांना आव्हान देण्यासाठी राजकीय गटांनी समोरासमोर स्टेज उभारले. अपेक्षेप्रमाणे येथे विचारांचे आदान-प्रदान झाले नाही, तर झाले ते फक्त ‘रिल्स’चे युद्ध! एका बाजूला ‘गब्बरसिंह’ आणि त्यांच्या ‘ब्लडर बँक’ नावाच्या अतरंगी गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘नादी  नको लागू, ढोलकीला बांधून बदा बदा बडवीन’ या गाण्यावर ठेका धरत एक व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ म्हणजे जणू काही राजकीय विरोधकांना दिलेली थेट धमकीच होती.

हे पाहून ‘सूर्यराजे’ आणि त्यांचे सहकारी शांतपणे स्मित हास्य करत सर्व प्रकार पाहात होते.  पाहता पाहता, बाप्पाच्या मिरवणुकीपेक्षा गब्बरसिंह’ आणि त्यांच्या ‘ब्लडर बँक’  केलेले चाळ्याचे दोन ‘रिल्स’चीच चर्चा अधिक होऊ लागली.

या संपूर्ण प्रकारात, बाप्पा तर पुढच्या वर्षी परत येतील, पण निवडणुकीचा हा ‘रिल्सोत्सव’ आतापासूनच सुरू झाल्याने, मतदारांना मात्र प्रश्न पडला आहे की, मत विकासाच्या मुद्द्यावर द्यायचे की ज्याचे रिल्स जास्त व्हायरल होतील त्याला द्यायचे?

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक :  “ढोल-ताशे थांबले… आता राजकीय फड रंगणार!”

Next Post

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ११ :इन्शुरन्स स्पेशालिस्ट’ विरुद्ध ‘ड्रग्ज स्पेशालिस्ट’ …

Next Post
धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण १: ‘विकासाचा वायफाय’

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ११ :इन्शुरन्स स्पेशालिस्ट’ विरुद्ध ‘ड्रग्ज स्पेशालिस्ट’ ...

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ६७ वर्षीय वृद्ध वडिलांना मुलगा अन् सुनेकडून लाथाबुक्क्यांनी, चपलेने बेदम मारहाण

October 23, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
  • धाराशिव : ६७ वर्षीय वृद्ध वडिलांना मुलगा अन् सुनेकडून लाथाबुक्क्यांनी, चपलेने बेदम मारहाण
  • धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!