धाराशिव शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. डीन डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Shilpa V. Domkundwar यांची अखेर बदली करण्यात आली असून, डॉ. शैलेंद्र चव्हाण यांची नवी डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसंचालक म्हणून मुंबईला बदली झाली आहे. डॉ. शैलेंद्र चव्हाण हे पूर्वी लातूरला शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते.
बदली का झाली?
डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Domkundwar यांची 10 फेब्रुवारी 2022 रोजी धाराशिव मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात निष्क्रियता, प्रशासनातील ढिलाई, तसेच आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. मेडिकल कॉलेजसाठी मंजूर झालेल्या सुविधा अद्याप उपलब्ध झाल्या नाहीत, तर काही महत्त्वाची उपकरणे जिल्ह्याबाहेर वळवण्यात आली.
धाराशिव लाइव्हचा सततचा पाठपुरावा रंगला!
धाराशिव लाइव्हने गेल्या काही महिन्यांपासून मेडिकल कॉलेजमधील गैरव्यवहार आणि निष्क्रियतेवर सातत्याने प्रकाश टाकला. विशेषतः एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन अन्य ठिकाणी हलवण्याच्या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. या बातम्यांमुळे प्रशासन हालले आणि अखेर डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Domkundwar यांची बदली झाली.
डॉ. शैलेंद्र चव्हाण यांच्याकडून अपेक्षा काय?
नवीन डीन डॉ. शैलेंद्र चव्हाण यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे.
- कॉलेजची व्यवस्था सुधारणे
- विद्यार्थ्यांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करणे
- जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा देणे
- आधीच्या गैरव्यवहारांचे पुनरावलोकन करून योग्य ती कारवाई करणे
लोकांचा सरकारला सवाल – “फक्त बदली पुरेशी आहे का?”
डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Domkundwar यांच्या बदलीने गैरव्यवहार मिटले, असे मानायचे का? त्यांच्यावर ठोस चौकशी आणि कारवाई होणार का? या बदलीसह सरकारकडून आणखी काय पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव लाइव्ह आपल्या वाचकांसाठी पुढील अपडेट्स देत राहील!