• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये दागिने बनवण्याच्या नावाखाली सराफाकडून लाखोंची फसवणूक, १७.९० लाखांचा ऐवज घेऊन पोबारा

admin by admin
July 13, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरात दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने एका सराफाने अनेक ग्राहकांची तब्बल १७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करून दुकान बंद करून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीनिवास अशोक शहाने (रा.  गजानन मार्केट, काळा मारुती चौक, धाराशिव ) याच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आण्णा श्रीपती पौळ (वय ४१, रा. सारोळा, ता. जि. धाराशिव) यांनी आपल्या मुलासाठी सोन्याचे लॉकेट बनवण्यासाठी ‘मातोश्री अलंकार‘ या दुकानाचे मालक श्रीनिवास शहाने यांच्याशी संपर्क साधला. ही घटना ४ जुलै २०२५ रोजी घडली. पौळ यांनी १० तोळ्याच्या लॉकेटसाठी शहाणे याला १० लाख ४० हजार रुपये रोख दिले होते. शहाणे याने ९ जुलै २०२५ रोजी लॉकेट देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, ९ जुलै रोजी पौळ दुकानावर गेले असता दुकान बंद असल्याचे त्यांना आढळून आले. आजूबाजूला चौकशी केली असता, शहाणे दुकान बंद करून पळून गेल्याचे त्यांना समजले.

याचवेळी, बालिका लिंबराज शिंदे रा. काजळा ( ता. धाराशिव ) यांनी देखील सदर सोनाराकडे ७ ग्रामचे झुबे टॉप्स ( किंमत ७२ हजार ८०० ) व पाच तोळ्याचे गंठण ( किंमत ५ लाख २० हजर ) असे एकूण ५ लाख ९२ हजार रुपयाचे दागिने करण्यासाठी टाकले होते. पैकी ५ लाख रुपये रक्कम दिली होती.. तसेच, लता सतीश आगळे नावाच्या महिलेचीही अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

अशाप्रकारे, आरोपी श्रीनिवास शहाणे याने आण्णा पौळ आणि इतर साथीदारांची एकूण १७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्याने सोन्याचे दागिने देण्याचे वचन देऊन पैसे व सोने घेतले आणि नंतर दुकान बंद करून पलायन केले.

या घटनेप्रकरणी १२ जुलै २०२५ रोजी रात्री १० वाजून २३ मिनिटांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३१६(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र विक्रम अंभोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सदर सोनार लोकांचे दागिने गहाण ठेवून व्याजाने पैसे देत असे. त्याचा हा धंदा अनेक दिवसांपासून सुरू असल्याने लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यातूनच जवळपास ३० हून अधिक लोकांनी त्याच्याकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवून व्याजाने पैसे घेतले होते. अखेर, लाखो रुपयांचे दागिने घेऊन सदर सोनाराने पोबारा केला.

Previous Post

कळंब: कत्तलीसाठी जाणारी ११ गोवंशीय जनावरे पकडली; निर्दयपणे वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये पैशांच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या; बाप-लेकावर गुन्हा दाखल

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिवमध्ये पैशांच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या; बाप-लेकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!