• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकाला धमकी; आनंद कंदलेवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार एकवटले

पत्रकारांवरील दडपशाहीविरोधात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन; पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी

admin by admin
August 25, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकाला धमकी; आनंद कंदलेवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार एकवटले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ‘बघून घेऊ’ अशी धमकी दिल्याप्रकरणी आनंद कंदले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकार एकवटले आहेत. पत्रकारांवर होणारी दडपशाही, अन्याय आणि खोट्या कारवायांच्या विरोधात पत्रकार संघटनांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

मागील काही काळापासून जिल्ह्यात सत्य आणि वास्तव मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणासह इतर अनेक अवैध धंद्यांवर बातमीदारी केल्यामुळे पत्रकारांना धमक्यांचे प्रकार वाढले आहेत. ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना तुळजापूरचे पोलीस निरीक्षक मांजरेंनी धमकावले होते. यानंतर, आनंद कंदले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ढेपे यांना “आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला तर काय होईल,” असे म्हणत धमकी दिली,

या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर अशा प्रकारे दबाव आणला जात असेल, तर पत्रकार निर्भीडपणे काम कसे करणार? हा लोकशाहीवर हल्ला आहे. काही दिवसांपूर्वी भूमचे पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी अवैध धंद्यांवर प्रश्न विचारला असता, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत एनसी दाखल करण्यात आली. हा केवळ आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे.

पत्रकारांच्या प्रमुख मागण्या:

  1. ‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकांना धमकावणारे आनंद कंदले यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.
  2. पत्रकारांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांची सखोल चौकशी व्हावी.
  3. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सुरक्षा पुरवण्यात यावी.
  4. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

यावेळी हुंकार बनसोडे, राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, बालाजी निरफळ, रहीम शेख, चंद्रसेन देशमुख, सयाजी शेळके, महेश पोतदार, शीला उंबरे, आकाश नरोटे, जुबेर शेख, किरण कांबळे, आतिक सय्यद, युसुफ मुल्ला, वैभव पारवे, सुभाष कदम, किशोर माळी, आयुब शेख, मुस्तफा पठाण, प्रमोद राऊत, कलीम शेख, पांडुरंग मते, मल्लिकार्जुन सोनवणे, अमजद सय्यद, गणेश जाधव, संतोष शेटे, कुंदन शिंदे, राकेश कुलकर्णी, विशाल जगदाळे, जब्बार शेख, कलीम सय्यद, सुरेश चव्हाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.

Previous Post

तुळजापूर बोगस मतदार नोंदणी प्रकरण: तपासात दिरंगाईचा आरोप, काँग्रेसने केली विशेष चौकशीची मागणी

Next Post

लेखणी थांबेल या भ्रमात राहू नका; ही झुंडशाही ठेचून काढल्याशिवाय पत्रकारिता शांत बसणार नाही!

Next Post
‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकाला धमकी; आनंद कंदलेवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार एकवटले

लेखणी थांबेल या भ्रमात राहू नका; ही झुंडशाही ठेचून काढल्याशिवाय पत्रकारिता शांत बसणार नाही!

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!