कळंब : फिर्यादी नामे-अक्षय पुरुषोत्तम भांडे, वय 26 वर्षे, र. कल्पनानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे त्यांचे मित्र अनिकेत अनिल गायकवाड व रितेश अशोक कसबे हे तिघे दि. 11.04.2024 रोजी 01.45 वा. सु. आंदोरा शिवार येथुन कळंबकडे येत असताना येडेश्वरी हॉटेलच्या पुढे अनोळखी चार इसमांनी फिर्यादी व त्यांचे मित्र यांना उलट्या कोयत्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवून त्यांचे जवळील रोख रक्कम अंदाजे 5,300₹ जबरीने लुटून पसार झाले. अशा मुजकुराच्या फिर्यादी नामे- अक्षय भांडे यांनी दि. 11.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 394, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : फिर्यादी नामे-कृष्णा बाळू क्षिरसागर, वय 25 वर्षे, रा. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहाते घरी झोपले असता अज्ञात तीन व्यक्तीने दि. 11.04.2024 रोजी 02.30 वा. सु. आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 14 ग्रॅमवजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 25,000₹ असा एकुण 35,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मुजकुराच्या फिर्यादी नामे- कृष्णा क्षिरसागर यांनी दि. 11.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 457, 380, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-आल्काबाई व्यंकट जाधव, वय 50 वर्षे, रा. आरोग्य नगरी, रविशंकर शाहेच्या पाठीमागे उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव या व त्यांचे पती व्यंकट जाधव हे दोघे दि. 09.04.2024 रोजी 15.30 ते 16.30 वा. सु.उमरगा माकणी बस ने तोरंबा येथे मारुतीचे दर्शनसाठी जात होते. उमरगा बसस्थानक ते येळी गावा दरम्यान आल्काबाई यांच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या अंदाजे 85,000₹ किंमतीच्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मुजकुराच्या फिर्यादी नामे- आल्काबाई जाधव यांनी दि. 11.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.