• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 9, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

admin by admin
February 24, 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष
0
SHARES
300
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारा हा विशेष लेख …

शिवसेना पुन्हा दुभंगली तेव्हा मराठवाड्यातून जे बोटांवर मोजण्याएवढे मोजकेच आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले त्यातील एक नाव म्हणजे कैलास घाडगे पाटील. धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार कैलास पाटील पीकविमा प्रश्नावरून आठवडाभर केलेल्या उपोषणातून चर्चेत राहिले. कळंब तालुक्यातील सारोळ्याचे गावचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख, असा त्यांचा राजकीय प्रवासाचा चढता आलेख राहिलेला आहे.

या राजकीय प्रवासात शेती आणि पाणी, यांना केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी स्वतःतील नेतृत्व विकसित करताना संघटन पातळीवर पकड निर्माण केली. मांजरा व तेरणा नदीवर असलेल्या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या जागी लातूर प्रारूपातील बॅरेजेस लावण्यासाठी असो की कृष्णा मराठवाडा योजनेंतर्गत असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम बदलून घेण्यासाठी असो, त्यानुषंगाने केलेल्या पाठपुराव्याला ते त्यांच्या कामांच्या यादीत प्राधान्याने अग्रभागी ठेवतात. आमदार कैलास पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत धाराशिव जवळील सारोळा गावात ९ किमीपर्यंत केलेले खोलीकरण व रुंदीकरण काम दखलपात्र ठरले.

धाराशिव येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले आमदार कैलास पाटील यांचे प्राथमिक शिक्षण देवधानोरा जिल्हा परिषद शाळेत झालेले आहे. उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातून स्वतंत्रच विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी पटलावर आणली. तसेच धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर करण्याची मागणी लावून धरली.

यासाठी ४९८ पदांनाही मंजुरी मिळवून घेतली.आमदार कैलास पाटील यांची २०१८ साली शिवसेना जिल्हाप्रमुखपदावर वर्णी लागली आणि पाठोपाठ जिल्ह्यातील राजकीय घडामोडीत झालेल्या बदलानंतर विधानसभेसाठी उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जेमतेम चाळिशीच्या आतील तरुण सर्वमान्य चेहरा म्हणून कैलास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

२०१९ च्या विधानसभेवर ते निवडूनही गेले. स्वतः प्रयोगशील शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून पुरस्कार पटकावणारे आमदार कैलास पाटील यांनी तरुण शेतकऱ्यांचे संघटनही मजबूत करून घेतलेले होते.

शिवाय २०१३ मध्ये २५० तरुण शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक कंपनीही स्थापन केली. त्याचा थेट फायदा ३ हजार शेतकऱ्यांना मिळवून दिला. यांत्रिकीकरणातून काढणी ते पेरणीचे ३०० एकरवर प्रयोग करून घेतले.

धाराशिवच्या राजकारणात आपला ठसा अमीट ठेवायचा असेल तर सहकार क्षेत्रातही स्वतंत्र अस्तित्वाची चुणूक दाखवणे गरजेचे, याची जाणीव ठेवून आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा सहकार मंडळावर पदधिकारी म्हणून काम केले. तर कै. भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, उस्मानाबादचे अध्यक्षपद सांभाळून सहकार क्षेत्रातही छाप पाडली आहे.

निष्ठा सर्वसामान्य माणसाशी निष्ठा शिवसैनिकांशी निष्ठा शिवसेनेशी निष्ठा मातोश्रीशी निष्ठा तळागाळातील शेतकर्‍यांशी जनसेवेसाठी राजकारणाला साधन मानुन सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न साकारणारे,प्रेरणास्त्रोत लोकांनी लोकासाठी निवडलेले नेतृत्व तत्वनिष्ठ अभ्यासू आदर्श व्यक्तीमत्व कैलास दादा पाटील

जनहितआणि विकासकारण या दोनच गोष्टी केंद्रस्थानी मानून त्याच्या पुर्तता करणारा एकमेव नेता मोजता येणार नाही उंची त्यांच्या कर्तुत्वाची जाणीव करून दिली ज्यांनी माणसातल्या माणुसकीची

कार्यकर्त्यांना जपणारा नेता हीच कैलासदादांची ओळख सामान्य कार्यकर्त्यांचे दु:ख कैलास दादांनी कायम जाणून घेतले त्यामुळेच ते आज लाखोंच्या गराड्यात पोहोचले मोठय़ा पदावर पोहोचूनही दादांनी कधीही मोठेपणा मिरविला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशीच त्यांची ‘ओळख’ जनमानसात आहे

एक उमदेपण आणि राजकारणातील मैत्री जपून महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय झालेला हा नेता सारोळा गावचा सरपंच जिल्हा परिषद सदस्य शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अशा प्रत्येक चढत्या पायंरीवर वावरणारे कैलादादा त्यांचे पाय मात्र जमिनीवरच आसतात त्यांच्यातला ‘मोठा माणूस’ हाच सगळया पदांपेक्षा मोठा आहे खरचं आज स्वर्गीय बाळासाहेब असते तर शब्बासकीची थाप या जननायकाच्या पाठीवर नक्कीच मारली आसती

पक्षाने दिलेली जबाबदारी पेलताना यशस्वी जिल्हाप्रमुख आमदार तसेच शिवसेनेचे विश्वासु शिलेदार म्हणून दादांनी महाराष्ट्रभर आपली ओळख निर्माण केली कैलासदादानी स्वतःच निर्भीड आणि निष्ठावंत रहात शिवसैनिकांना एकञ पक्षाशी जोडुन ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन त्यांनी आजच्या राजकीय परीसस्थीतुन बाहेर पडत तरुणाईला एक आदर्श घालून दिला आहे

महाराष्ट्राने आनेक राजकाणी पाहीले पण इतका दिलदार, आणि बेरजेचं राजकारण करणारा सर्वसमावेशक नेता क्वचितच सत्ताकारणात पाहीला असेल कुणाच्याही दावणीला बांधुन न घेणारा कुणाच्याही छावणीत स्वाभिमानाशी तह न केलेला बोले तैसा चाले अशी रोखठोक भुमिका असलेला नेता अशीच कैलासदादाची ओळख धाराशिव सह उभ्या महाराष्ट्राने पाहीली राजकारणाच्या मांदियाळीत माणूसकीचा दीपस्तंभ असलेले कैलासदादा मला हे सांगताना आनंद वाटतो की मागील काळात दादांनी धाराशिव कळंब मतदारसंघातील विविध काम करत असताना हजारो कोटींच्या आसपास निधी आणून विकासाची गंगा जिल्ह्यातील प्रत्येक भागात आणली त्यानी फक्त सामाजिक राजकीय वैद्यकीय च न्हवे तर शैक्षणिक क्षेत्राततही तितकेच प्रगतशील पणे कामे केली गरजू विद्याथ्यांना आर्थिक मदत असो वा मानसिक अनुभवाची मदत आसो शेतकर्‍यावर होत आसलेल्या आन्याय विरोधात दंड थोपटून उभा रहाने आसो दादांनी ऐन दिवाळीच्या सनात उपोषणाला बसुन अवघ्या महाराष्ट्रात शेतकर्‍याच्या प्रश्नाना वाच्या फोडली होती हे ही विसरता येणारच नाही माणसातले माणूसपण जपणाऱ्या दादांना आनेक जनआशीर्वाद लाभले हे तेवढेच सत्य

मला अभिमान आहे की पक्षाच्या चांगल्या काळात आणि वाईट काळातही मी आज माझ्या पक्षासोबत पक्षप्रमुखांसोबत ओमदादा कैलासदादा सोबत भगव्या झेंड्यासोबत एकनिष्ठ म्हणून उभा आहे कारण जेव्हा राजकारणातला र देखील कळत नव्हता तेव्हा पासून आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक आहोत हे मनावर चांगलं बिंबवले गेले आहे साहेबांनी दिलेलं बाळकडू कडवा शिवसैनिक कधी विसरणार नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी शेवटच्या दसरा मेळाव्यात भरल्या डोळ्यांनी जे आव्हान केलं होतं की मला सांभाळलंत माझ्या उद्धवला सांभाळा आदित्य ला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या हे शब्द आजही डोळ्यासमोर आहेत ओमदादा आणि कैलास दादा यांनी हाच दिलेला शब्द एकनिष्ठ रहात पुर्ण केला त्यासोबतच आम्ही तेव्हाचं साहेबांना दिलेलं वचन देखील विसरलेलो नाही आसे परखड पणे महाराष्ट्राला ओमदादानी आणि कैलासदादानी सागीतले कैलास पाटील यांच्या निष्ठेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक त्यांचं कौतुक करत आहे. कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांसाठी आदर्श ठरलेल्या कैलास पाटील यांचं हे भगवा झेंडा, शिवसेना, मातोश्री, ठाकरे यांच्यावरचं प्रेम आणि निष्ठेचं फळ त्यांना भावी आयुष्यात नक्कीच मिळेल हा विश्वास आहे

धाराशिव जिल्हयाचे लाडके जिल्हा प्रमुख युवकसम्राट युवकांचे स्फुर्ती स्थान कळंब धाराशिव मतदार संघाचे लाडके आमदार आदरणीय कैलास दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

– प्रवीण केसकर, धाराशिव

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय

Next Post

धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण भाग ३: ‘आमदारांच्या आश्रयानेच ड्रग्ज विक्री’, सामाजिक कार्यकर्त्याचा पोलिसांना स्फोटक जबाब!

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माझ्यावरील गुन्हा घाईघाईने, द्वेष भावनेने दाखल

May 8, 2025
धाराशिव कचरा पुराण: धुराच्या लोळात राजकीय खिचडी!

धाराशिव कचरा पुराण: धुराच्या लोळात राजकीय खिचडी!

May 8, 2025
कौडगावच्या MIDC त ‘टेक्निकल टेक्स्टाईल पार्क’ की ‘टेक्निकली गवताळ पार्क’?

‘लेदर’ गेले, ‘टेक्स्टाईल’ आले… घोषणांचे ‘डिजिटल’ खेळ चालूच राहिले!

May 8, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि लुटीच्या घटनांमध्ये वाढ

May 8, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी परिसरात ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

May 8, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group