कळंब : फिर्यादी नामे- ब्रिजलाल गुलाबचंद भुतडा, वय 59 वर्षे, रा.ढोकी रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे ढोकी रोड कळंब येथील अण्णाभाउ साठे चौकात श्रीगणेश ट्रेडर्स बिल्डींग मटेरियल चे दुकानाचे अज्ञात पाच व्यक्तीने शटर उचकटून आत प्रवेश करुन घराच्या रुमचे व दुकानातील शटरचे कुलूप दि.19.05.2024 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. तोडून लोखंडी रॉडचा धाक दाखवून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, नाईस कंपनीच्या दोन व टाईमॅक्स कंपनीचे एक अशा तीन स्मार्ट वॉच,रोख रक्कम 1,59,000₹असा एकुण 2,65,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ब्रिजलाल भुतडा यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 395 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-पंकज काशीनाथ कोळी, वय 39 वर्षे, रा.यादव प्लॉटींग रतन ढोबळे यांचे घरी सांजा चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.18.05.2024 रोजी 09.00 ते दि. 19.05.2024 रोजी 02.45 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी कपाटातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 1,00,000₹ असा एकुण 1,85,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पंकज कोळी यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-विनायक मारुती रोकडे, वय 70 वर्षे, रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे रात्री जेवण करुन झोपले असता घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 16.05.2024 रोजी 10.00 वा. सु. ते दि. 17.05.2024 रोजी 07.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील प्लॅस्टीकच्या डब्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30,000₹ किंमतीचे तसेच घराशेजारी राणारे सुभाष जयप्रकाश पाटील यांचे व्हिडीओकॉन कंपनीचा एल.ई.डी. टी.व्ही. असा एकुण 55,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विनायक रोकडे यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-भाग्यश्री राजेश मामीलवाड, वय 31 वर्षे, रा. शिवबा नगर देगलुर ता. देगलुर जि. नांदेड हा. मु. येडशी बस्थानक जवळ येडशी ता. जि. धाराशिव या उन्हाळी सुट्टयामध्ये त्यांचे गावी गेल्या असता त्यांचे रहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 18.05.2024 रोजी 23.00 ते दि. 19.05.2024 रोजी सकाळी 07.00 वा. पुर्वी तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 86,000 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भाग्यश्री मामीलवाड यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : दि. 28.04.2024 रोजी 16.00 ते दि. 29.04.2024 रेजी 11.00 वा. सु. रुई शिवारातील सर्वे नंबर 52 मधील वनविभागाचे राखीव क्षेत्रातील जाळी तारेचे कंपाउंडपैकी 90 मिटर जाळी तर अंदाजे 12,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संकेत उध्दव टाके, वय 31 वर्षे, व्यवसाय- नोकरी रा. चौसाळा ता.जि. बीड यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- धनाजी विठ्ठल तनवडे, वय 45 वर्षे, रा. कौडगाव ता. जि. धाराशिव हे दि.05.02.2024 रोजी 09.00 वा. सु. कौडगाव शिवारातील शेतात पाईपलाईन खोदण्याचे काम करीत असताना अज्ञात व्यक्तीने धनाजी तनवडे यांचा अंदाजे 18,999 ₹ किंमतीचा विवो वाय 56 मॉडेलचा गोल्डन रंगाचा मोबाईल फोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धनाजी तनवडे यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-शिवाजी शंकरराव जाधव, वय 44 वर्षे, रा. मुळजतांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो स्पेलंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 4263 ही दि.17.05.2024 रोजी 11.00 ते 15.30 वा. सु. आरोग्य नगरी भारत विद्यालय कॉम्पलेक्स मधील गजानन पेंन्ट चे दुकानाजवळ उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी जाधव यांनी दि.19.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.