• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

के.टी. पाटील अनधिकृत पुतळा प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला आ. चौगुले यांचा ‘खो’

अनधिकृत पुतळ्याला कार्योत्तर मान्यता देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती कळवली

admin by admin
February 19, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
के.टी. पाटील अनधिकृत पुतळा प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला आ. चौगुले यांचा ‘खो’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या प्रांगणात उभा करण्यात आलेला गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा येत्या १५ दिवसांत स्वतःहून काढून घ्यावा अन्यथा प्रशासनाच्या वतीने पुतळा काढण्याबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी अंतिम नोटीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास बजावली होती. त्यामुळे लोकांकडून लाखो रुपये वर्गणी गोळा करून उभा करण्यात आलेला के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा काढण्याची नामुष्की सुधीर पाटील यांच्यावर ओढावली होती.

यावेळी उमरग्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले हे सुधीर पाटील यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र देऊन, के.टी. पाटील यांच्या अनधिकृत पुतळ्यास कार्योत्तर मान्यता देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना “अ ” प्रमाणे प्रस्तावित करावे, असा शेरा लिहिला होता. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी वस्तुस्थिती कळवली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष वेधले आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थासाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनाधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूल विरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतर देखील सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा जिल्हा प्रशासनाची मान्यता न घेताच उभा केला असून, त्याचे अनावरण काही दिवसापूर्वी करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम धाराशिव लाइव्हने दिले होते.

शहरातील भोसले हायस्कुलच्या प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा जिल्हा प्रशासनाची मान्यता न घेताच शासनाच्या जागेत उभा करण्यात आलेला आहे. तसेच जागेबाबत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली आहे.त्यामुळे अनाधिकृत तसेच अतिक्रमित इमारत पाडून पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या अर्जाची सत्य पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कोणाच्या परवानगीने पुतळा उभा केला ? याचा खुलासा येत्या २४ तासात करावा अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली होती. त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षाने थातुरमातुर खुलासा केला होता. हा खुलासा अमान्य करत जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला होता. गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा येत्या १५ दिवसांत स्वतःहून काढून घ्यावा अन्यथा प्रशासनाच्या वतीने पुतळा काढण्याबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी अंतिम नोटीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास बजावली होती.

एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई सुरु असताना, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा सुधीर पाटील यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडे धाव घेतली. पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधीनी पाठ फिरवली असताना, उमरग्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र देऊन, या अनधिकृत पुतळ्यास कार्योत्तर मान्यता देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना “अ ” प्रमाणे प्रस्तावित करावे, असा शेरा लिहिला असता त्यावर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शासनास वस्तुस्थिती कळवली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष वेधले आहे.

काय आहे तक्रार ?

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेल्या इमारत संदर्भात मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा करण्याबाबत दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळास आदेशित केलेले आहे.

तथापि मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या उक्त आदेशानुसार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने अध्याप पावेतो अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा केलेला नाही. कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा करण्याकरिता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: पुतळा-३११६/प्र.क्र.३०८/२९ दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीनुसार जिल्हा प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक असताना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा प्रशासनाच्या विना अनुमती कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा केला असल्याने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने हेतुपुरस्सर भंग केला आहे.तेव्हा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेली इमारत व कै. के.टी. पाटील यांचा उभा केलेला अनाधिकृत पुर्णाकृती पुतळा तात्काळ हटविण्यात यावा.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार

Next Post

जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकाऱ्याकडून केराची टोपली

Next Post
जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकाऱ्याकडून केराची टोपली

जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकाऱ्याकडून केराची टोपली

ताज्या बातम्या

एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल

एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल

August 14, 2026
तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

August 14, 2026
धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

गुळहल्ली शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; 87 हजार 600 रुपये जप्त

August 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

August 14, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त

August 14, 2026

Recent Posts

  • एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल
  • तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप
  • गुळहल्ली शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; 87 हजार 600 रुपये जप्त
  • रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई
  • भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!