• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त

येरमाळा परिसरातील वडजी शिवारात धाड; एकाला ठोकल्या बेड्या, साथीदारांचा शोध सुरू

admin by admin
May 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा: धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरातील वडजी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार रुपयांचा अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलिसांकडून पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एलसीबीचे पथक येरमाळा येथे आले असता, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. वडजी शिवारातील डोंगरात असलेल्या तलावाजवळ एका लिंबाच्या झाडाखाली ताडपत्रीने झाकून गुटख्याची पोती विक्रीसाठी लपवून ठेवली आहेत आणि तिथे तेरखेडा (लक्ष्मी पारधी पिढी) येथील काही जण थांबले आहेत, अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तत्काळ येरमाळा गाठले. त्यांनी येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भालेराव आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या सात ते आठ जणांनी पळ काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग करून डोंगरातून छगन बिसराम शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याला शिताफीने पकडले.

६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पकडलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने ताडपत्रीखालील पोत्यांमध्ये गुटखा असल्याची कबुली दिली. तसेच हा माल मस्सा आणि तेरखेडा येथील साथीदारांसोबत आणल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी ताडपत्री हटवून पाहणी केली असता, वेगवेगळ्या पोत्यांमध्ये ‘राजनिवास’ गुटखा आणि सुगंधी तंबाखू आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून गुटखा, सुगंधी तंबाखू आणि आरोपींच्या तीन मोटारसायकली असा एकूण ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी छगन शिंदे याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि तात्याराव भालेराव यांच्यासह पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोह शोभा बांगर, चापोह महेबुब अरब, रोहित दंडनाईक आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने पार पाडली.

 

Previous Post

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post

प्रवेश बंदी आदेशाचे उल्लंघन; तुळजाभवानी मंदिराचे कुलूप तोडणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

प्रवेश बंदी आदेशाचे उल्लंघन; तुळजाभवानी मंदिराचे कुलूप तोडणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group