• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
246
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील कुन्हाळी येथे घडली. रविवारी (ता. १७) सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनी रणजित गोजले (वय २७, रा. कुन्हाळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुन्हाळी येथील सोनी गोजले हिने माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या रोजच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून सोनी हिने रविवारी (ता. १७) सकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेनंतर मयत सोनी यांचे नातेवाईक मारुती नागाप्पा इश्वरे (वय ५८, रा. वाडी कासार शिरसी, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी उमरगा पोलिस ठाण्यात रविवारीच फिर्याद दिली. या दिलेल्या प्रथम खबरीवरून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती रणजित राजाराम गोजले, फुलाबाई राजाराम गोजले, बालाजी राजाराम गोजले, संजय राजाराम गोजले (सर्व रा. कुन्हाळी, ता. उमरगा) आणि शुभद्रा संजय भेगिले (रा. तुरोरी, ता. उमरगा) या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलिस करत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; घरफोडीसह बसस्थानकावर चोरी, ६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

Next Post

धाराशिवमध्ये ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त

Next Post
धाराशिवमध्ये ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त

धाराशिवमध्ये 'एलसीबी'ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी नेली जाणारी गोवंशीय जनावरे पोलिसांकडून जप्त; एकावर गुन्हा दाखल

May 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; राघुचीवाडीत घरफोडी तर डोमगावमध्ये मोटारीचे साहित्य लंपास

May 18, 2026
 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

प्रवेश बंदी आदेशाचे उल्लंघन; तुळजाभवानी मंदिराचे कुलूप तोडणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

May 18, 2026
धाराशिवमध्ये ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त

धाराशिवमध्ये ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; तब्बल ६२ लाखांचा गुटखा जप्त

May 18, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

May 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group