धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा समाजाच्या तरुणांनी आजपासून आंदोलन उभारले आहे. गेल्या तासभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा आंदोलकांनी जिल्हा दंडाधिकारी न्यायालय कक्षातील रूममध्ये कोंडून घेतले असून रूम आतून बंद करून घोषणाबाजी सुरू केली आहे. आंदोलकांचा आरोप आहे की, प्रशासन मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.
आंदोलक रूमच्या आत असताना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन बाहेर थांबले आहेत. जिल्हाधिकारी आंदोलक बाहेर येण्याची वाट पाहत आहेत, तर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कार्यालयाच्या परिसरात गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून तणाव वाढण्याची शक्यता आहे.
Video