• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

राणा पाटलांच्या हवेतल्या घोषणा! आधी लेदर पार्क, नंतर टेक्स्टाईल आणि आता थेट ‘दारुगोळा’; ठाकरे गटाचा खोचक टोला!

admin by admin
April 26, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
वाह रे पठ्ठ्या! दिवसा ड्रग्जमुक्तीच्या गप्पा, रात्री ड्रग्ज माफियाच्या मांडीला मांडी…
0
SHARES
303
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा धाराशिवकरांना एक नवं स्वप्न दाखवलं आहे. कौडगाव एमआयडीसीमध्ये आता चक्क दारुगोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा कारखाना (डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब) उभारण्यात येणार असल्याची ‘बॉम्ब’रूपी घोषणा त्यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. निबे लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून तब्बल दोन हजार कोटींची गुंतवणूक आणि २००० विविध प्रकारच्या अभियंत्यांना रोजगार मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एवढंच नाही, तर इथे आधी नियोजित असलेला ‘टेक्निकल टेक्स्टाईल पार्क’ आता अन्य एमआयडीसीत हलवणार असल्याचंही त्यांनी अगदी सहज सांगून टाकलं.

आमदार साहेबांच्या घोषणांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’

आमदार साहेबांच्या या नव्या घोषणेवर आता जिल्ह्यातून मिश्किल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राणा पाटलांच्या घोषणांचा इतिहास पाहिला, तर त्यांच्या घोषणा केवळ ‘हवेतच’ विरतात, अशी टीका आता उघडपणे होऊ लागली आहे.

  • पहिलं गाजर: सुरुवातीला धाराशिवमध्ये ‘लेदर पार्क’ उभारण्याच्या मोठ्या वल्गना झाल्या. तो पार्क कागदावरच राहिला.

  • दुसरं गाजर: त्यानंतर कौडगावमध्येच ‘टेक्निकल टेक्स्टाईल पार्क’ उभारणार असल्याचं सांगण्यात आलं. आता खुद्द आमदारांनीच तो दुसरीकडे हलवणार असल्याची कबुली दिली आहे.

  • तिसरं गाजर: आणि आता थेट ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ आणि दारुगोळा कारखान्याची घोषणा!

कधी लेदर, कधी कापड तर कधी दारुगोळा… धाराशिवकरांच्या हातावर फक्त नवनवीन घोषणांचीच तुळशीपत्रं ठेवली जात आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

“सगळ्या कंपन्या बंद पडत्यात काय की…” – सोमनाथ गुरवांची मिश्किल टिप्पणी

राणा पाटलांच्या या दोन हजार अभियंत्यांना रोजगार देण्याच्या घोषणेची आता सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी फेसबुकवर एक खोचक पोस्ट करत आमदारांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.

गुरव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अतिशय मिश्किल शब्दांत टोला लगावला आहे:

“धाराशिव मध्ये २००० हजार केमिकल इंजिनियर पाहिजेत, सगळ्या कंपन्या बंद पडत्यात काय कि 😜”

सोमनाथ गुरव यांचा हा टोला सध्या चांगलाच व्हायरल होत असून, ‘कागदावरचे इंजिनिअर आणि हवेतले कारखाने’ यावर धाराशिवकर मनसोक्त हसत आहेत. एकंदरीत काय, तर धाराशिवच्या विकासाचं हे ‘मॉडेल’ फक्त घोषणांच्याच फैरी झाडणार की प्रत्यक्षात कौडगावच्या माळरानात एखादी वीट तरी रचली जाणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Previous Post

पत्नीशी फोनवर बोलल्याचा जाब विचारल्याने बाप-लेकाला बेदम मारहाण; आळणी येथील घटना

Next Post

येरमाळा : मलकापूरमध्ये तलावात बुडून १५ वर्षीय वारकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post
येरमाळा : मलकापूरमध्ये तलावात बुडून १५ वर्षीय वारकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

येरमाळा : मलकापूरमध्ये तलावात बुडून १५ वर्षीय वारकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

July 28, 2026
विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

July 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

July 28, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

July 28, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!