• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरूम प्रकरण : मुलाच्या विक्रीप्रकरणी आईसह सात जणांवर गुन्हा; तपास जळगावकडे वर्ग

admin by admin
July 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
396
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: केवळ दहा हजार रुपयांसाठी आपल्या अडीच वर्षांच्या पोटच्या मुलाला विकल्याच्या धक्कादायक प्रकरणात अखेर मुलाच्या आईसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूम (ता. उमरगा) पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचे मुख्य सूत्रधार चाळीसगाव येथील असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.  पीडित बालक आजारी असून, त्याच्यावर सध्या धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आईनेच विकले पोटचे बाळ

या प्रकरणात बालकाची आई, करुणा अमोल तळभंडारे, हीच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तिने चाळीसगाव येथील गोकुळ चौधरी याच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यानंतर आपली मामी यशोधरा गायकवाड हिच्या मदतीने तिने मुलगा शुभम याला उज्ज्वला आणि बाळू कांबळे या दाम्पत्याला दहा हजार रुपयांमध्ये विकले. ही संपूर्ण विक्री केवळ १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर करारनामा करून बेकायदेशीर दत्तकविधानाच्या नावाखाली पार पाडण्यात आली.

आजी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठपुरावा

बालकाची आजी लता तळभंडारे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, सुरुवातीला पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल, दौसाली भोसले आणि युवराज डावरे यांनी या प्रकरणात पाठपुरावा केला. अखेर बालकल्याण समितीने (CWC) या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर मुरूम पोलिसांनी कारवाई केली.

या सात जणांवर गुन्हा दाखल

  1. करुणा अमोल तळभंडारे (पीडित बालकाची आई) 
  2. यशोधरा दिनेश गायकवाड (आईची मामी) 
  3. उज्ज्वला बाळू कांबळे (बालकाला विकत घेणारी महिला) 
  4. बाळू शिष्य कांबळे (बालकाला विकत घेणारा पुरुष) 
  5. सुधीर ढेपे 
  6. लक्ष्मी नागनाथ गायकवाड 
  7. गोकुळ चौधरी (आईचा दुसरा पती, रा. चाळीसगाव) 

बालकाची प्रकृती चिंताजनक, पोलिसांवरही आरोप

विक्री करण्यात आलेला बालक शुभम याला ताप आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सध्या बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली असून, समितीने त्याची आजी लता तळभंडारे यांची तात्पुरते ‘केअर टेकर’ म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान दहिफळे यांनी गैरवर्तणूक देत आजी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना खोलीत डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. पवार यांच्या हस्तक्षेपानंतर जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणी दहिफळे यांच्यावर कारवाई करावी आणि पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. 

Previous Post

परंडा: खिडकी बसवण्याच्या क्षुल्लक वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

उमरग्यात हृदयद्रावक घटना: खेळताना तलावात बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू

Next Post
उमरग्यात हृदयद्रावक घटना: खेळताना तलावात बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू

उमरग्यात हृदयद्रावक घटना: खेळताना तलावात बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!