• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद निवडणूक: “विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी निधीला स्थगिती का दिली, याचे उत्तर द्यावे”

आमदार कैलास पाटील यांचा विरोधकांवर घणाघात

admin by admin
November 29, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर परिषद निवडणूक: “विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी निधीला स्थगिती का दिली, याचे उत्तर द्यावे”
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. संगीताताई गुरव आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत आमदार कैलास पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “सध्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी, आम्ही मंजूर केलेल्या निधीला स्थगिती का दिली? याचे आधी उत्तर द्यावे आणि मगच विकासावर बोलावे,” अशा शब्दांत आमदार पाटील यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील यांनी ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेला निधी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर कसा जाणीवपूर्वक अडवण्यात आला, याचा पाढाच वाचून दाखवला. ते म्हणाले की, “शहरातील जिजामाता उद्यान आणि छत्रपती संभाजीराजे उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राज्यात सत्ताबदल होताच या कामाला स्थगिती देण्यात आली. आठवडी बाजारासाठी आलेला १० कोटींचा निधीही याच पद्धतीने अडवण्यात आला.”

तुळजाभवानी स्टेडियमसाठी मंजूर झालेला १० कोटी रुपयांचा निधी देखील रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर बोलताना आमदार पाटील यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “शहरातील रस्त्यांसाठी तब्बल १४० कोटींचा निधी मंजूर होता. परंतु, केवळ एका ‘लाडक्या कंत्रादारास’ हे काम मिळावे, यासाठी १८ महिने काम होऊ दिले नाही. त्यामुळे शहराचा विकास कुणामुळे खुंटला, हे जनतेला आता समजले आहे.”

या जाहीर सभेत आमदार कैलास पाटील यांनी मांडलेल्या विकासकामांच्या लेखाजोखामुळे विरोधकांची कोंडी झाली असून, उपस्थित जनसमुदायाने आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद दिला.

Previous Post

“धाराशिवचं ‘रंगबदलू’ विमान आणि दोन तासांची जादू!”

Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक: ऐन वेळी मतदान मशीनवरील ‘तुतारी’चा क्रमांक बदलला

Next Post
धाराशिव नगर परिषद निवडणूक: ऐन वेळी मतदान मशीनवरील ‘तुतारी’चा क्रमांक बदलला

धाराशिव नगर परिषद निवडणूक: ऐन वेळी मतदान मशीनवरील 'तुतारी'चा क्रमांक बदलला

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!