• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नगर परिषद निवडणूक : अर्ज भरण्यास एक दिवस बाकी, पण आघाड्यांमध्ये ‘एकमत’ नावालाच…

 महायुती-महाविकासच्या बैठकांमध्ये मनोमिलनाऐवजी 'मनोभेदच'

admin by admin
November 15, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
 पालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज नाही; राजकीय हालचाली थंडच
0
SHARES
481
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस तोंडावर आला असताना, धाराशिवमधील प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतल्याचे चित्र आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीच्या मनोमिलनासाठी बैठका पार पडल्या, मात्र दोन्हीकडेही अपेक्षित ‘मनोमिलन’ झाल्याचे दिसले नाही.महायुतीची बैठक तुळजापूर येथील एका मठात पार पडली, तर महाविकास आघाडीची बैठक धाराशिव शहरातील राजे कॉम्प्लेक्समध्ये झाली.

महायुतीत मोठा ‘पेच’; पहिली फेरी फिस्कटली

महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला असून, बैठकीची पहिली फेरी फिस्कटल्यातच जमा असल्याचे वृत्त आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार राजन साळवी आणि जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार पाटील यांनी धाराशिव आणि तुळजापूर येथील जागा निश्चित केल्या असून, तेथे शिंदे गटाला कोणताही वाटा मिळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्याचे समजते.फार तर जिल्हाप्रमुख सूरज साळुंके आणि सुधीर पाटील यांना आम्ही ऍडजस्ट करू, असे सांगिल्यामुळे बैठक गुंडाळण्यात आली.मुंबईमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक घेऊन महायुती एकसंघ असल्याचे सांगण्यात आले होते, पण स्थानिक बैठक मध्ये शिंदे गटाला कोलण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी असून, साळवी यांनी तात्काळ पक्षश्रेष्ठींना या घडामोडीची माहिती दिली आहे. आता पुढील दोन दिवसांत होणाऱ्या बैठकांमध्ये मार्ग निघाला, तरच महायुतीचे घोडे पुढे सरकणार आहे.

‘नाराजीनाट्य’: आमदार तानाजी सावंतांची बैठकीकडे पाठ

महायुतीच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे माजी मंत्री आणि आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांना बैठकीचे निमंत्रण असूनही ते अनुपस्थित राहिले. 

या अनुपस्थितीमागेही नाराजीनाट्य असल्याचे बोलले जाते. सावंत यांच्याच मतदारसंघातील भूम व परंडा नगरपालिकांमध्ये त्यांच्या विरोधातच आघाडी करण्याचे मनसुबे रचले जात असून, यात खुद्द भाजपच आघाडीवर असल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून सावंत बैठकीला गैरहजर राहिल्याचे समजते.

महाविकास आघाडीतही ‘मतभेद’ कायम

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या गोटातही फारसे आलबेल नाही. राजे कॉम्प्लेक्स येथे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीतही नगरसेवक पदाच्या अनेक जागांवर एकमत होऊ शकले नाही.  आघाडीतील मतभेद कायम असल्याचे दिसून आले.

इच्छुकांची भाऊगर्दी, ‘विनिंग कॅपॅसिटी’ ठरणार निकष

आघाड्यांमध्ये गोंधळ सुरू असताना, दोन्ही बाजूंकडे इच्छुकांची प्रचंड भाऊगर्दी झाली आहे.

  • भाजप: नगराध्यक्षपदासाठी तब्बल २९ जणांनी, तर नगरसेवक पदासाठी १९८ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. 

  • महाविकास आघाडी: नगराध्यक्षपदासाठी ७ जण (५ शिवसेना-ठाकरे गट, प्रत्येकी १ काँग्रेस व राष्ट्रवादी) आणि नगरसेवक पदासाठी १६१ जण इच्छुक आहेत.

तब्बल ९ वर्षांनी निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपसमोर ४१ जागांमध्ये मित्रपक्षांना सांभाळण्याचे आव्हान आहे. दोन्ही आघाड्यांसमोर बंडखोरीची भीती असून, हे आव्हान पेलणे पक्षश्रेष्ठींसाठी मोठी कसरत ठरणार आहे.

शेवटच्या टप्प्यात, हा गोंधळ पाहता, पक्ष आणि गटबाजी बाजूला सारून केवळ ‘विनिंग कॅपॅसिटी’ (जिंकण्याची क्षमता) असलेल्या उमेदवारालाच तिकीट देण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.

 तुळजापुरात महंतांच्या नावाची चर्चा

महायुतीमध्ये तुळजापूरच्या जागेसाठी महंत तुकोजी बुवा ( ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गँगने यांचे बंधू )  यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विनोद गँगने यांच्या नावाला भाजप पक्षश्रेष्ठी मान्यता देणार नाही म्हणून आ. राणा पाटील यांनी हा पर्याय काढला आहे. विशेष म्हणजे, महायुतीची बैठक याच महंतांच्या मठात झाली होती. याबाबत स्वतः तुकोजी बुवा यांना विचारले असता, त्यांनी बैठकीत अन्य चर्चा झाल्याचे सांगितले, मात्र स्वतःच्या उमेदवारीबाबत मौन बाळगणे पसंत केले. 

Previous Post

‘नळाला २४ तास पाणी’… १५ वर्षांनी पुन्हा तेच आश्वासन; धाराशिवकर म्हणतात, ” दादा , हे गाजर किती दिवस?”

Next Post

‘आधी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे राणा पाटलांनी सांगावे’; तानाजी जाधवर यांचे फेसबुक पोस्टवरून थेट आव्हान

Next Post
‘खरेपणा’ आणि राणा पाटलांचा संबंध नाही; बिहारशी तुलना करून जनतेचा अपमान करू नका

'आधी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे राणा पाटलांनी सांगावे'; तानाजी जाधवर यांचे फेसबुक पोस्टवरून थेट आव्हान

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group