• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘आधी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे राणा पाटलांनी सांगावे’; तानाजी जाधवर यांचे फेसबुक पोस्टवरून थेट आव्हान

"निवडणुकीच्या तोंडावरच भ्रष्टाचाराचा साक्षात्कार का झाला? जून २०२२ पासून तुम्हीच सत्तेत," जाधवर यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

admin by admin
November 15, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘खरेपणा’ आणि राणा पाटलांचा संबंध नाही; बिहारशी तुलना करून जनतेचा अपमान करू नका
0
SHARES
219
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  शहरातील भुयारी गटार योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आमदार राणा पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. “भुयारी गटार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला झाला,” अशी टीका करत, “त्या अगोदर राणा पाटील यांनी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे स्पष्ट करावं,” अशी मागणी जाधवर यांनी केली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तानाजी जाधवर यांनी भारतीय जनता पक्षावर व आमदार राणा पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जाधवर म्हणतात, “भुयारी गटार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला झाला हे अपेक्षितच होते. मुळात या योजनेला सुद्धा न्यायालयात आव्हान देणारी हीच मंडळी होती. न्यायालयाने देखील त्यांच्या वेळोवेळी केलेल्या सर्व पाच याचिका फेटाळल्या होत्या.”

सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जाधवर यांनी म्हटले आहे की, “यात काय चुकीचं होतं, तर जून २०२२ पासून तुम्हीच सत्तेत आहात आणि तुमच्या सुदैवाने तेच नगरविकास मंत्री आहेत. मग याची चौकशी करण्याची मागणी आजवर तुम्ही का केली नाही?”

निवडणुका जवळ आल्याने भाजपकडे बोलण्यासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळेच हा सर्व खटाटोप सुरू असल्याचा आरोपही जाधवर यांनी केला आहे. “निवडणुकीच्या तोंडावर काहीच मुद्दे नसल्याने आता कशावर तरी बोलायला पाहिजे म्हणून हा खटाटोप सुरु आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

पोस्टच्या शेवटी, या संपूर्ण योजनेबद्दल आम्ही (ठाकरे गट) योग्यवेळी सविस्तर भूमिका मांडू, असे स्पष्ट करत त्यांनी पुन्हा एकदा मूळ आव्हानावर बोट ठेवले. “असो. या संपूर्ण योजनेबद्दल आम्ही योग्यवेळी आमची भूमिका मांडूच पण त्या अगोदर राणा पाटील यांनी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे स्पष्ट करावं. एवढंच आमचं म्हणणं आहे,” असे म्हणत जाधवर यांनी चर्चेला नवे तोंड फोडले आहे.

Previous Post

नगर परिषद निवडणूक : अर्ज भरण्यास एक दिवस बाकी, पण आघाड्यांमध्ये ‘एकमत’ नावालाच…

Next Post

उमरगा: ५ लाख परत घ्या, पण जमीन परत द्या! शेतकऱ्याची गयावया व्यर्थ; नैराश्यातून वृद्धाने संपवले जीवन

Next Post
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

उमरगा: ५ लाख परत घ्या, पण जमीन परत द्या! शेतकऱ्याची गयावया व्यर्थ; नैराश्यातून वृद्धाने संपवले जीवन

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group