• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा: ५ लाख परत घ्या, पण जमीन परत द्या! शेतकऱ्याची गयावया व्यर्थ; नैराश्यातून वृद्धाने संपवले जीवन

कोरेगाववाडी येथील धक्कादायक घटना; जमीन परत देण्यास नकार देणाऱ्या महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

admin by admin
November 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा –  उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी येथे एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोविंद विश्वनाथ लवटे (वय ६५, रा. कोरेगाववाडी) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी मयत गोविंद लवटे यांचे पुत्र काशिनाथ गोविंद लवटे (वय २६) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मयत गोविंद यांनी आरोपी मुक्ताबाई श्रीमंत बाचके (रा. कोरेगाववाडी) यांच्या पतीकडून पाच लाख रुपये घेतले होते. या रकमेच्या बदल्यात त्यांनी आपली दीड एकर शेतजमीन तोंडी अटीवर दिली होती.

काही काळानंतर, मयत गोविंद लवटे यांनी पाच लाख रुपयांची जुळवाजुळव केली. त्यांनी मुक्ताबाई बाचके यांना “आमच्याकडे पाच लाख रुपये आले आहेत, ते घ्या व आमची जमीन आम्हाला परत करा,” अशी विनंती केली. मात्र, आरोपी मुक्ताबाई यांनी त्यांची दीड एकर जमीन परत देण्यास स्पष्ट नकार दिला.

आपले पैसे परत देऊनही जमीन परत मिळत नसल्याच्या नैराश्यातून गोविंद लवटे यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले. दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी लक्ष्मण सोलनकर यांच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेनंतर, काशिनाथ लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, उमरगा पोलिसांनी आरोपी मुक्ताबाई श्रीमंत बाचके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ अन्वये (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

‘आधी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे राणा पाटलांनी सांगावे’; तानाजी जाधवर यांचे फेसबुक पोस्टवरून थेट आव्हान

Next Post

भूम: ऊसतोड मजुराचे लक्ष्मी नगरातून अपहरण; कर्नाटकातील साखर कारखान्यात नेऊन २३ दिवस डांबले!

Next Post
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

भूम: ऊसतोड मजुराचे लक्ष्मी नगरातून अपहरण; कर्नाटकातील साखर कारखान्यात नेऊन २३ दिवस डांबले!

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!